वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल
इंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ' मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक 'कॉन्टर जूर ' या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल . ' कॉन्टर जूर ' हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ' यूजफूल ' असतात, हे दाखवण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' आयफोन ' आणि ' आयपॅड ' वरील ' कॉन्टर जूर ' हा गेम ' ऑनलाइन 'स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे . हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ' द लिटल प्रिन्स ' या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ' पेटिट ' या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळताना प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ' अॅप्स ' ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ' वन डायमेन्शनल ' नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .