सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी
तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटनांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. समाजातील...
तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटनांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. समाजातील...
इन्स्टन्ट मेसेज सेवेने गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वांच्या मोबाइलमध्ये स्थान मिळवलं आहे . यामुळे मूळच्या एसएमएस सेवेला मोठा धक्का बसला आहे . सुरुवातीला ही इन्स्टन्ट मेसेजिंग सेवा काही मर्यादित फोन्सवर उपलब्ध होती . मात्र , कालांतराने मोबाइलचे अवतार बदलत गेले आणि नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आल्या . यामुळे विविध अॅप्स बाजारात आले . यात व्हॉटस्अॅप हे सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे . भारतातील ५२ टक्के स्मार्टफोन युजर्स व्हॉटस्अॅपचा वापर करतात तर उर्वरित लोक फेसबुक मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत . फेसबुकने आपलं अँण्ड्रॉईड मेसेंजर बाजारात आणलं आहे . पण त्यात सध्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांशीच आपण बोलू शकतो . हा मेसेंजर बाजारात आल्यावर तो व्हॉटस्अॅपला टक्कर देईल , अशी भाकीते रंगवली गेली होती . पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही . थिंक डीजिट या साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणातही बाब समोर आली आहे . यामध्ये सध्याचे भारतातील स्मार्टफोन युजर्स कोणते मेसेंजर वापरतात आणि त्यांचे त्यावरचे म्हणणे काय आहे याचा पूर्ण विचार करण्यात आला आहे . या सर्वेक्षणानुसार भारतातील स्मार्टफोन युजर्सपैकी २५ टक्के युजर्स कोणत्याही प्रकारची मेसेजिंग सेवा वापरातनाहीत . ५२ टक्के लोक व्हॉटस्अॅप वापरतात तर , १४ टक्के लोक फेसबुक मेसेंजर वापरतात . ९ टक्के लोक फेसबुक मेसेंजर अँड्रॉईड व्यतिरिक्त इतर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरता येईल याची वाट पाहत आहेत . फेसबुक मेसेंजरमधील मर्यादा आणि इतर बाबी लक्षात घेता त्याचा वापर करणे फारसे कोणाला पसंत नसल्याचे या सर्वेक्षणातसमोर आले आहे . फेसबुकने मेसेंजर सेवा बाजारात आणून सध्याच्या प्रस्थापितांना दणाणून मात्र सोडलं आहे .पुढच्या काळात जर ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आली आणि त्यातील सर्व मर्यादा काढून टाकण्यात आल्या तर सध्याच्या सेवांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत . व्हॉटस्अॅपमध्ये आपल्या फोनबुकमधील लोकांशी संपर्क साधता येतो . मात्र , फेसबुक मेसेंजरमध्ये भविष्यात आपल्याला फेसबुकफ्रेंड्सबरोबरच फोनबुकमधील लोकांशीही संपर्क साधता येणार आहे . याचदरम्यान फेसबुक व्हॉटस्अॅपला विकत घेणार अशा अफवाही सुरू झाल्या आहेत .
पूर्वी पत्ता विचारायचा झाला , की रस्त्यावरील एखाद्याव्यक्तीला गाठले जायचे . आजही तसे होते पण सध्याच्या युगात पत्ता किंवा एखादे ठिकाण शोधण्याकरिताइंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे ... पूर्वी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे झाल्यास त्या ठिकाणीजायचे कसे ? जवळची खूण काय ? असा तपशील गोळा करावा लागे . मात्र , आता इंटरनेटवर सर्च करायचाअवकाश की तेथे कसे जायचे , जवळचा रस्ता कोणता आदी माहिती काही क्षणांतच मिळते . ' जीपीएस ' वर आधारित मोबाइल असल्यास इंटरनेटच्या साह्याने मॅपचे अॅप्लिकेशन सुरू करून संबंधित ठिकाणीपोचता येऊ शकते . कागदावरील मॅपचे थोडक्यात नकाशांचे व्हर्च्युअल रूप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलनेआपल्या मॅप्सच्या सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारितमोबाइल फोनमध्ये गुगलच्या मॅप्सचे अॅप दिलेले असते . नसल्यास ते डाउनलोड करून घेणे उपयोगाचे ठरू शकते. गुगलच्या मॅपच्या आधारे अनेक लोकांनी त्यांची घराचे पत्ते अॅड केले आहेत . त्यामुळे गुगल मॅपवरून संबंधितव्यक्ती कोठे राहते किंवा संबंधित व्यक्तीचे ऑफिस कोठे आहे , हे कळते . मात्र , आयफोन बनविणाऱ्या अॅपलकंपनीने ' गुगल मॅप ' सुविधा आयफोनवरून काही महिन्यांपूर्वी काढून टाकली होती . अॅपलने स्वतःची मॅपसर्व्हिस सप्टेंबरमध्ये सुरू केल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते . पूर्वी अॅपलच्या आयफोनमध्ये गुगल मॅपचे प्री - लोड अॅप येत होते . ते बंद करण्याच्या कंपनीच्या या निर्णयासग्राहकांकडून तीव्र विरोध झाला . अखेर अॅपल कंपनीने आयफोनवर गुगलची फ्री मॅप सुविधा पुन्हा उपलब्ध करूनदिली आहे . चाळीस देशांत तिचा अॅक्सेस करणे शक्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले . गुगलने आकाशातून दिसणारेदृश्य , टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन हे नवे फीचर उपलब्ध केले आहे . ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डाउनलोडच्या बाबतीतही अॅपल अॅप स्टोअरवर गुगल मॅपिंग अॅपला सर्वाधिक मागणी होती . गुगल मॅप अॅपलच्याउत्पादनावर उपलब्ध झाला आहे . यूजर पब्लिट ट्रान्झिट इन्फॉर्मेशन यावर पाहू शकणार आहे ; तसेच लाइव्हट्रॅफिक अपडेटबरोबर स्ट्रीट व्ह्यू फीचरचाही यात समावेश करण्यात आला आहे . यामुळे यूजरना विविध प्रकारचीमाहिती आपल्या गरजेनुसार जाणून घेता येणार आहे . गुगलचे मॅप किती लोकप्रिय आहे , हे अॅपलच्या ग्राहकांच्यामागणीवरून कळू शकते . अॅपल या कंपनीची गुगल ही स्पर्धक कंपनी आहे . मात्र , असे असतानाही यूजरचीमागणी पूर्ण करण्यासाठी अॅपलला पुन्हा ही सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी लागली आहे .
बाजारातला सगळ्यात भारी फोन आपण हौसेनं घेतो , पणत्याचा वापर मात्र पुरेपूर होत नाही . बऱ्याचदा फोनमध्ये अॅप्स असूनही त्याचं काय करायचं ते कळत नाही . हीअॅप्स जरा समजून घेतली तर , लाइफ और आसान बन सकती है भिडू . एमईटी प्रस्तुत मुंबई टाइम्सकार्निवलमध्ये याच विषयावर सेमिनार झालं . वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ही धमाल सेटिंग जुळून आली .यावेळी सर्वांत आधी आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असेलेल्या १२ अॅप्सबद्दल विद्यर्थ्यांना माहितीदेण्यात आली , ती अशी .. गुगल गॉगल्स हे अॅप वापरून आपण आपल्या मोबाइलवरुन फोटोच्या माध्यमातून सर्च करू शकतो . म्हणजे , समजा आपणएखद्या प्रसिद्ध मंदिराचा फोटो घेऊन तो सर्च केला , तर आत्ता आपण असलेल्या ठिकाणापासून तिथे जाण्याचासंपूर्ण मार्ग हे अॅप आपल्याला दाखवतं . इतकंच नव्हे , तर एखाद्या वस्तूचा फोटो जर आपण सर्च केला , तर त्यावस्तूबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यायला मिळू शकते . ड्रॉपबॉक्स आपला महत्वपूर्ण डेटा क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करता येतो तो या अॅपमुळे . हे अॅप प्ले स्टोअरमध्येहीउपलब्ध आहे . यातून स्टोअर केलेला डेटा आपण कधीही आणि कुठेही अगदी मोबाइलमध्ये , लॅपटॉपमध्ये किंवाकम्पुटरमध्ये ओपन करू शकतो . शेयर कॉंटॅक्ट्स व्हाया एसएमएस फोनमधले कॉंटॅक्ट्स शेअर करायला आपल्याला मदत करतं ते हे अॅप . तेही एसएमएसच्या मदतीने . सध्याबहुतांश मोबाइलमध्ये बिसनेस कार्ड पाठवण्याची सोय नसते , अशा मोबाइलमध्ये हे अॅप खूप उपयुक्त ठरतं . एमएक्स प्लेयर हे अॅप सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स प्ले करतो . या अॅपमध्ये ब्राइटनेस वाढवणे , झूम आणि इतर फीचर्सवापरू शकतो . यामुळे आपल्याला फिल्म पाहण्याचा चांगला आनंद लुटता येतो . स्कॅन हे अॅप QR कोड स्कॅन करायला वापरलं जातं . सध्या विविध जाहिरातींमध्ये QR कोड वापरला जातो . यामुळे आपल्याला जाहिरात आपल्या मोबाइलवर पाहता येऊ शकते . याचबरोबर त्यातील अधिक माहितीही आपल्यालायातून मिळते . एव्हेर्नोट आयडियाज किंवा आपल्या कामाबद्दलची माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं . ही माहितीआपण मोबाइल , कम्पुटर असे कुठेही आणि काहीही ओपन करू शकतो . झोमॅटो हे अॅप तुमच्या एरियामधलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि मेन्यू कार्ड्स अशा गोष्टी शोधण्यात मदत करतं . हे अॅपजीपीएसचा वापर करून आपल्याला उपयुक्त असं रिझल्ट देतं . निंबझ हे अॅप सगळ्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे . या अॅपमधून फेसबुक , हॉटमेल , जीमेलचं अकाउंटवापरता येतं . शिवाय मित्र आणि मैत्रिणीशी चॅटही करता येतं . झेझ या अॅपमधून वॉलपेपर , रिंगटोन्स , थीम्स आणि इतर गोष्टी फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात . वायबर ...
अॅपलच्या युझर्सना केवळ अॅपल स्टोअरमधून अॅप डाऊनलोडकरण्याची मुभा आहे . पण अँड्रॉइडचे तसे नाही . ओपन सोर्सअसल्याने गुगल प्ले स्टोअरसोबतच इतरही अनेक ठिकाणाहून अॅप्स डाऊनलोड करता येतात . या ठिकाणाहूनअॅप्स डाऊनलोड करण्यात तसा फार धोका नाही . गुगलने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या युझर्सला सुविधादेण्याची परवानगी त्यांना दिली यातच खूप काही आले . गेट जार अब्जावधी डाऊनलोड्समुळे गेट जार अनेक प्रस्थापित अॅप्स स्टोअरसाठी आव्हान म्हणून समोर आले आहे .याठिकाणी फोनच्या प्रकारानुसार अॅप्स फिल्टर करण्याची सुविधा उपलब्ध आहे . जगभरात सर्वत्र उपलब्धअसल्यामुळे अनेक डेव्हलपर याला प्राधान्य देतात . आजकाल काही डेव्हलपर्सला आर्थिक सहाय्य देण्यासही गेटजारने सुरुवात केली असून त्यांच्या अॅप्स मात्र ग्राहकांना मोफत वितरीत केल्या जातात . याठिकाणी ब्लॅकबेरीआणि विंडोज मोबाइलसाठीच्या अॅप्सही उपलब्ध आहेत . अॅप ब्रेन अॅप ब्रेन हे अँड्रॉइड मार्केट ब्राऊझरला पर्याय म्हणून उपलब्ध आहे . त्यामुळे याठिकाणी अॅप्सची थेट विक्री होतनाही . मात्र , सर्च आणि विविध आकर्षक पर्यायांमुळे अनेक जण याकडे आकर्षित होतात . याठिकाणी मोफत , पेड, नव्याने दाखल झालेले , अपडेट केलेले अशा प्रकारचे फिल्टरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत . मात्र , यातीलकाही अॅप्स व्हर्जननुसार देण्यात आले असून त्यामुळे काही अमेरिकेबाहेर डाऊनलोड करता येत नाहीत . स्लाइड मी सॅम (SAM) या अॅप्लिकेशनद्वारे अँड्रॉइड युझर्स स्लाइड मी वरील अॅप्स ब्राऊज आणि डाऊनलोड करू शकतात .याठिकाणी छोट्या आणि उदयोन्मुख डेव्हलपर्सवर विशेष लक्ष दिले जात असल्याने नवीन काहीतरी याठिकाणीपहावयास मिळू शकते . या ठिकाणी पेड आणि फ्री अशी दोन्ही प्रकारची अॅप्स उपलब्ध आहेत . अॅप्सफायर अॅप्सफायर स्वतः कुठल्याही प्रकारचे अॅप्स देत नाही . केवळ अधिकृत अॅप्स स्टोअरचे सहयोगी म्हणून हे कार्यकरते . तुमच्या नेहमीच्या वापराच्या अॅप्लिकेशनवरून हे तुमच्यासाठी काही अॅप्स सुचवतेही . हे सुचविलेले अॅप्ससोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकतात . याठिकाणी निवडक तज्ञांनी अॅप्सलादिलेल्या रेटिंगच्या आधारे त्यांची लोकप्रियता ठरविली जाते . तसेच , मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरअॅप्सवर देण्यात येतात . अप्रूव्ह अप्रूव्ह हे नव्यानेच सादर करण्यात आलेले अॅप्स स्टोअर असून त्याचे प्रमुख लक्ष अँड्रॉइड अॅप्स आहे . याठिकाणीविविध कॅटेगरीजमधून अॅप्स पाहता येतात . युझर्सच्या सूचना , रिव्ह्यू , व्हिडीओ अपलोड यासारख्या गोष्टीयाठिकाणी करता येतात . तुलनेने हे नवीन मार्केट असल्याने याला युझर्सचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणेउत्सुकतेचे ठरेल . याव्यतिरीक्त मोबिहँड म्हणूनही एक अॅप्स स्टोअर बऱ्याच काळापासून उपलब्ध होते .याठिकाणी विविध अॅप्सवर अनेक प्रकारचे डिस्काऊंड मिळत होते . अॅपसह विविध अॅक्सेसरीजचीही विक्रीयाठिकाणी होत होती . मात्र , दोन - तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ही साइट बंद केली .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech