आता व्हॉट्सअॅपवर पाठवा व्हॉइस मेसेज
स्मार्टफोन वापरणा-या 'यंगिस्तान'साठी चकटफू मेसेजिंगची सेवा देणा-या व्हॉट्सअॅपने नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे युझर्सना व्हॉइस मेसेज पाठवता येतील....
स्मार्टफोन वापरणा-या 'यंगिस्तान'साठी चकटफू मेसेजिंगची सेवा देणा-या व्हॉट्सअॅपने नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे युझर्सना व्हॉइस मेसेज पाठवता येतील....
कुठलीही गोष्ट मोफत मिळत असेल , तर सर्वांचा पहिला ओढा त्याकडे असतो . पण या मोफत गोष्टींसाठी आपल्याला केवढी मोठी किंमत मोजायला लागते हे बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही . गुगल , याहू मोफत इमेल सेवा पुरवतात .पण त्याबदल्यात ते यूजर्सवर जाहिरातींचा मारा करतात .आता तर या कंपन्यांनी यूजर्सचे मेल , सर्फिंग केलेल्या साइट्सच्या आधारे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिराती देणे सुरू केले आहे . अशाच पद्धतीने फ्री अॅप्सही यूजर्सकडून काही छुपी किंमत वसूल करत आहेत . अॅप्स तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीला मोफत अॅप पुरविणे शक्य नसते. काही कंपन्या यूजर बेस वाढविण्यासाठी , अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मोफत अॅप पुरवतात. छोट्या कंपन्यांना मात्र त्यातून उत्पन्न मिळणे गरजेचे असते . या कंपन्या त्यासाठी जाहिरातींची मदत घेतात . या जाहिराती सुरुवातीला त्रासदायक वाटत नसल्यातरी त्या तुमच्या इंटरनेटचे पॅकेज घटवत असतात. यामाध्यमातून तुमच्यावर मालवेअरचा हल्ला होऊ शकतो . गुगल प्लेवरील ७४ टक्के अॅप्सच्या माध्यमातून मालवेअरचा हल्ला होतो , असे मकॅफीचा अहवाल सांगतो . मालवेअरच्या हल्ल्याचा धोका बहुतांश अॅप्स इन्स्टॉल करताना अनेक परमिशन्स विचारल्या जातात . कोणत्या परमिशन्स विचारल्या जात आहेत याकडे न पाहता आपण डोळे मिटून ओके करतो . त्यात अनेकवेळा पर्सनल माहिती , कॉल रेकॉर्ड , डिव्हाइसमधील डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी विचारली जाते . अगदी गेम किंवा बातम्यांचे अॅप्सही तुमच्याकडे पर्सनल इन्फॉर्मेशन अॅक्सेस करण्याची परवानगी विचारतात . यामुळे संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपन्या हा डेटा जाहिरातदारांना पुरवतात . मग तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून तुमच्या मोबाइलवर जाहिराती पाठविल्या जातात किंवा तुमच्या मोबाइलवर विविध ऑफर्स , लॉटरीचे एसएमएस पाठवले जातात . त्यानंतर तुमच्या नावे तुमच्या फ्रेंडलिस्टमधल्यांना किंवा कॉन्टक्टलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना काही चुकीचे मेल , मेसेज पाठविले जातात . यासाठी काहीवेळा तुमच्या मोबाइलमधील बॅलन्सचाही उपयोग केला जाऊ शकतो . ' गुगल प्ले ' चा वापर सुरक्षित त्यातल्या त्यात सुरक्षेची बाब म्हणजे , गुगल प्लेसारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणारे अॅप तुलनेने सुरक्षित असतात .कारण या कंपन्यांकडून अॅप्स उपलब्ध करून देण्याआधी काही सुरक्षा चाचण्या केल्या जातात . या चाचण्यांवर ते पात्र ठरले नाहीत , तर गुगल ते नाकारते . मग हे अॅप्स इतर वेबसाइटवर उपलब्ध होतात . त्यामुळे अनेक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये गुगल प्ले व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून अॅप्स इन्स्टॉल करायचे किंवा नाही यासाठी विशेष सेटिंग्ज करावी लागते . शक्यतो गुगल प्ले व्यतिरिक्त इतर पर्यायांमधून अॅप्स इन्स्टॉल न करणे हा खबरदारीचा पहिलामार्ग आहे .
सध्याच्या काळात सर्वाधिक वेगाने वाढणारी मोबाइल ऑपरेटिंग स्टिस्टीम म्हणून अँड्रॉइड ओळखली जातेय. पण अनेकवेळा मेमरी नसल्यामुळे अॅप्स इन्स्टॉल करताना प्रॉब्लेम...
तंत्रज्ञानाचे जाळे जसजसे वाढत जाईल , तसे कम्प्युटर , लॅपटॉप , टॅब्लेट , स्मार्टफोन हे सगळे एकाच माळेतले वेगवेगळ्या आकारातील मणी वाटतील, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही . टीव्ही ,कम्प्युटर , इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्याच आहेत . स्मार्टफोनवर इंटरनेट पाहता येईल, सर्च करता येईल , असे कुणालाही वाटले नव्हते ; पण तसे झाले . आता आणखी एक वरची पायरी या क्षेत्रात येऊ घातलीय . ती म्हणजे ' अॅपल ' च्या आयफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सॉफ्टवेअर वापरता येणार आहेत . वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट आयफोनवरही वापरता येणार आहे . वेगवेगळी सॉफ्टवेअर स्मार्टफोनवर वापरता येतील , याकडेच तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे . आयफोनवरील सॉफ्टवेअरच्या वापरासाठी कंपनी कुठलेही नवे व्हर्जन तयार करणार नाही ; तसेच अॅन्ड्रॉइड व्हर्जनसाठी वेगळी ' अॅप ' बनवणार नाही . ' मायक्रोसॉफ्ट ' ची विंडोज सिस्टीम असणाऱ्या टॅब्लेट कम्प्युटरवर ही सॉफ्टवेअर्स वापरता येणार आहेत . मोबाइलसाठी बनवण्यात आलेला ' ऑफिसमोबाइल ' चा सूट अॅपलच्या ' अॅप ' स्टोअरमध्ये ' फ्री ' उपलब्ध आहे ; मात्र त्यासाठी दर वर्षाला 'ऑफिस ३६५ ' विकत घ्यावे लागणार आहे . ' ऑफिस ३६५ ' असेल , तर मॅक असलेल्या कम्प्युटरवर आणि विंडोज कम्प्युटरवर ते वापरता येईल . ' ऑफिस ' चे पॅकेज असेल , तर वेगवेगळ्या कम्प्युटरवर ते चालवता येईल ; तसेच त्याचे अपडेटही मिळतील . कम्प्युटरवरच्या फाइल आयफोनवर ओपन करता येतील . केवळ ' हेवी वर्क ' त्यामध्ये करता येणार नाही . मोठे ग्राफिक , एखादा मोठा प्रबंध आणि त्याचे पूर्ण डिझाइन करायचे असेल , तर कम्प्युटरशिवाय पर्याय नाही ; मात्र छोट्या कामांसाठी ' आयफोन ' वापरता येईल . मेल करणे ,फाइलमध्ये छोटासा बदल करणे , काही शब्द वाढवणे , काढणे , प्रेझेंटेशन सादर करण्यासारख्या गोष्टी आयफोनवरील ' ऑफिस सॉफ्टवेअर ' मध्ये करता येतील . कम्प्युटरवरील फाइल आयफोनवर ऑटोमेटिक रिसाइज होतील . आयफोन अॅपमुळे कम्प्युटरवर तयार करण्यात आलेले चार्ट ,अॅनिमेशन आणि इतर माहितीमध्ये काहीही बदल होणार नाही . अमेरिका सोडून इतर देशांत लवकरच हे प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे . एकंदरीतच कम्प्युटरचा आकार स्मार्टफोनपर्यंत लहान होत चाललाय , असे म्हटले , तर ते चुकीचेठरणार नाही . कम्प्युटरवरील सगळी अॅप्लिकेशन आता हळूहळू स्मार्टफोनवरही करता येत आहेत .इंटरनेट , ऑफिस सॉफ्टवेअर , गाणी ऐकणे , व्हिडिओ यांसारख्या फॅसिलिटी स्मार्टफोनवरही आहेत .फरक आहे , तो केवळ काम करण्याच्या क्षमतेचा . हा फरकही आगामी काळात पुसट होत जाऊन 'युनिव्हर्सल पॅकेज ' असलेले एकच डिव्हाइस बाजारात येईल , अशी कल्पना करायला तूर्तास तरी हरकत नाही !
पं. कुमार गंधर्व यांच्यापासून ते गझलगायक जगजितसिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या संगीताचा आनंद, त्यांच्याविषयी माहिती आता एका टॅबच्या टप्प्यात आली आहे. नाशिकच्या वैभव महाजन या संगीतप्रेमी इंजिनीअर तरुणाने भारतीय संगीतातील काही दिग्गज कलावंत अँड्रॉइडअॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर आणले असून, ही अॅप्लिकेशन विनामूल्य डाउनलोड करता येतात. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या महाजनची 'आबराका डाबरा सॉप्टवेअर सोल्युशन्स' ही कंपनी आहे. तो स्वतः संगीताचे चाहता असून, गेली काही वर्षे तबल्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहे. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षं पुण्यात आणि युरोपमध्ये वास्तव्य केल्यानंतर आता तो नाशिकमध्ये राहातो.गेल्या वर्षभरात त्याने पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, कौशिकी चक्रवर्ती, पं. जितेंद्र अभिषेकी,तबलावादक आदित्य कल्याणपूर, ध्रुपद गायक पं. उल्हास कशाळकर, गझलगायक जगजितसिंग या दिग्गज कलाकारांची अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार केली आहेत.या अॅप्लिकेशनविषयी माहिती देताना महाजन म्हणाले, 'सध्या इंटरनेटमुळे कोणाचीही माहिती मिळू शकते. मात्र, ती एकगट्ठा पद्धतीने उपलब्ध होत नाही. या अॅप्लिकेशनमुळे संगीतप्रेमींना या कलाकारांविषयीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. बदलत्या काळात अँड्रॉइड मार्केट ही मोठी क्रांती ठरली आहे. संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या देशविदेशातील महत्त्वाच्या कलाकारांसाठी हे माध्यम व्यासपीठ ठरावे असा प्रयत्न आहे. सध्या वाढत असलेल्या स्मार्टफोनच्या वापरामुळे अशा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक कलाकार लोकांसमोर येऊ शकतील.'या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्याने या कलाकारांविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती,व्हीडिओ, गाणी, फोटो एकत्र केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही अॅप्लिकेशन विनामूल्य आहेत.'आता त्यांना ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, गायक वसंतराव देशपांडे, शौनक अभिषेकी, संगीतकार शांतनू मोईत्रा, ज्येष्ठ तबलावादक योगेश सम्सी या कलाकारांचीही अॅप्लिकेशन करण्याची इच्छा आहे.'या अॅप्लिकेशन्सना अँड्रॉइड मार्केटवर चांगला प्रतिसादही मिळू लागला असून, हजारांच्या घरात डाउनलोड झाले आहेत. तसेच वापरणाऱ्यांनी त्याबाबत चांगल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. येत्या काही कालावधीत वैभव हीच अॅप्लिकेशन अँड्रॉइडसह ब्लॅकबेरी आणि आयफोनवरही उपलब्ध करून देणार आहे.
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech