आला पावसाळा गॅजेट सांभाळा
रिमझिम पावसात लोकलच्या दारात उभं राहून हेडफोनवर गाणी ऐकण्यासारखं सुख नाही. पण या कल्पनेचा विचका तेव्हा होतो , जेव्हा आपला एमपीथ्री किंवा...
रिमझिम पावसात लोकलच्या दारात उभं राहून हेडफोनवर गाणी ऐकण्यासारखं सुख नाही. पण या कल्पनेचा विचका तेव्हा होतो , जेव्हा आपला एमपीथ्री किंवा...
सॅमसंगने भारतात नुकताच आपला गॅलक्सी नोट 2 सादर केला आहे. त्यानंतर ही कोरियन कंपनी आता आपला नवा गॅलक्सी कॅमेराही लाँच...
कागद पेनाचा वापर कधी संपणार, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर कदाचित नाही देता येणार. कारण कागद पेन हे...
कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ' विंडोज ८ ' ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली . विंडोज यूजरना ' विंडोज ८ ' साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले . दीर्घकाळ चालणारी बॅटरी , वेगवान बूटिंग , लहान मेमरी याबरोबर ' विंडोज ७ ' च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरना ' विंडोज ८ ' पूरक असणार आहे . माउस , की - बोर्ड आणि टचबरोबर काम करता येऊ शकेल , असेयाचे डिझाइन आहे आणि हेच या ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य आहे . ' विंडोज ८ ' आणि ' सरफेस टॅब्लेट ' ची विक्री शुकव्रारपासून सुरू होणार आहे . सध्याच्या स्टार्ट मेनू आणि आयकन्सच्या पलीकडचा विचार करून ' विंडोज ८ ' चा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे . अॅप्लिकेशनच्या अपडेट्सची माहिती यावरून मिळू शकणार आहे . टचस्क्रीनचा लक्षात घेऊन यावरील टाइल मोठ्या करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ' टच ' करणे सोपे जाणार आहे . स्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यासाठी ऑयकॉन आपोआप झाकला जातो .यापूर्वी लाँच झालेल्या काहीऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता . विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री - लाँचसाठी प्रयत्न केले आहेत . मात्र ,कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे . विंडोज ८ मध्ये प्रत्येकासाठी नवे काही ना काही तरी असेल ,असा अंदाज आहे . टॅब्लेट पीसीप्रेमींसाठी टचस्क्रीन सुविधा ,नवा इंटरफेस आणि डेस्कटॉपबरोबरच येत असलेल्या पारंपरिक सॉफ्टवेअरना पूरक असे हे नवे सॉफ्टवेअर असणार आहे . मात्र , असे असले तरी ही ऑपरेटिंग सिस्टिम का घ्यावी, असा प्रश्न अनेक कंपन्यांना आहे . कंपनीने काही वर्षांपूर्वी विंडोज ७ बाजारात आणले . मात्र , अजूनही अनेक यूजर हे विंडोज एक्सपीवरून विंडोज ७ ला अपग्रेड होऊ शकलेले नाहीत . विंडोज ८ चा प्लॅटफॉर्म हा बिझनेस प्लॅटफॉर्मपेक्षा कन्झ्युमर प्लॅटफॉर्म असल्याचे वाटते आहे . त्यामुळे कंपन्यांना याकडून फारशा अपेक्षा नाहीत .परिणामी , कंपन्यांकडून विंडोज ८ ला मागणी असण्याची शक्यता कमी आहे . कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा मोठा ग्राहक हा बिझनेस कॅटेगरीतला आहे . पर्सनल कॅटेरीचे प्रमाण तुलनेत कमी आहे . भारतासारख्या ठिकाणी पर्सनल कम्प्युटरवर लायसन्स प्रॉडक्ट वापरण्याबाबत फारशी जागरूकता नाही . एखादी कंपनी किंवा प्रॉडक्टला चांगला वा वाईट प्रतिसाद या गोष्टी घडत असतात . व्यवसाय कशा पद्धती बदलत आहे याचे उदाहरण म्हणून विंडोज ८ कडे पाहायला हवे . मात्र , कंपनी ग्राहक आणि वैयक्तिक ग्राहक यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे हे संकेत आहेत , असाही कयास काही तज्ज्ञांनी बांधला आहे . टॅब्लेट पीसी आणि पीसी यांबाबत कोणतीही तडजोड करण्यास व्यावसायिक ग्राहक तयार नाहीत . त्यामुळे विंडोज ८ ला थोडाफार प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे .टच एक्सपिरिअन्समध्ये आपण मास्टर आहोत , याची चुणूक मायक्रोसॉफ्टकडून नव्या ऑपेरिंग सिस्टिमच्यामाध्यमातून दाखविली जाण्याची शक्यता आहे . कंपनी करत असलेले मार्केटिंग हे तरुण ग्राहकांना समोर ठेवून करण्यात आले आहे . विंडोज ८ चे ट्रायल व्हर्जन वर्षभरापूर्वी बाजारात उपलब्ध करून देण्यात आले . मात्र , कंपन्यांकडून याला थंड प्रतिसाद मिळालेला आहे . फोक्सवॅगन कंपनीने गेल्या वर्षी साठ हजार कम्प्युटरवर विंडोज ७ ही ऑपरेटिंग सिस्टिम बसविली . वर्षानंतर कंपनी नव्या ऑपरेटिंग सिस्टिमला अपग्रेड होण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांकडून विंडोज ८ ला थंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीतआहेत .
गेल्या काही दिवसांत लिनोवो या कंपनीने घराघरात प्रवेश करून डेस्कटॉपवर आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता लिनोवोच्या...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech