आजवर Cowin पोर्ट्ल सह आरोग्य सेतु, Paytm सारख्या ठिकाणी लसीसाठी स्लॉट बुक करण्याचा पर्याय होता. आता थेट आपल्या फोनमार्फत व्हॉट्सॲपवरच हे बुकिंग करता येईल. नव्या पर्यायानुसार व्हॉट्सॲपवर केवळ स्लॉट बुक करता येणार असून त्या आधी करावी लागणारी नोंदणी/रजिस्ट्रेशन cowin.gov.in वेबसाइटवरच करावी लागेल. सर्व सदस्यांची नोंदणी झाल्यावर लसीकरण केंद्रामधील वेळेचा स्लॉट बुक करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करू शकता.
व्हॉट्सॲपने यासाठी चॅटबॉटचा वापर केला असून यामार्फत Cowin प्रमाणेच स्लॉट बुक करता येईल. मात्र इतर उपलब्ध स्लॉट्स, लसीकरण केंद्रे यांची माहिती इथे सहज दिसणार नाही.
- प्रथम My Gov Corona Helpdesk चा +919013151515 हा क्रमांक सेव्ह करून घ्या किंवा या लिंकवर जा
- आता Book Slot असा मेसेज पाठवा
- त्यानंतर तुम्ही Cowin वर रजिस्टर केलेल्या नंबरवर मेसेजमार्फत OTP येईल
- आलेला OTP टाइप करून सेंड करा
- आता तुम्ही Cowin वर नोंदणी केलेल्या सदस्यांची नावे दिसतील
- कुणासाठी लस घ्यायची आहे त्या त्या नावासमोरील अंक टाइप करून सेंड करा
- आता Search By Pincode वर क्लिक करा
- आता फ्री किंवा Paid असे दोन पर्याय येतील. तुमच्या गरजेनुसार निवडा
- आता उपलब्ध लसीकरण केंद्रांची नावे दिसतील त्यासमोर अंक दिलेला असेल
- जे केंद्र निवडायचे आहे त्यासमोरील अंक टाइप करून सेंड करा
- आता तुमचा स्लॉट बुक झाल्याचा मेसेज येईल. हा मेसेज घेऊन तुम्ही लसीकरण केंद्रात दिलेल्या वेळी जाऊ शकता.
काही दिवसांपूर्वीच याच क्रमांका मार्फत लसीचं प्रमाणपत्र/सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचीही सोय देण्यात आली होती.
Search Terms : How to to Book Vaccination Slots on WhatsApp MyGov Corona Helpdesk