गेल्या काही वर्षात मागे पडत गेलेला स्मार्टफोन ब्रॅंड म्हणजे एलजी. यांचे फोन्स तर उत्तम गुणवत्तेचे आहेत मात्र या फोन्सची एकंदरीत चर्चाच होत नसल्यामुळे विक्रीमध्ये अपयशी ठरत आहेत. तरीही एलजी प्रयत्न करत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे हा नवा पाच कॅमेरे असलेला फोन LG V40 ThinQ !
होय या फोनमध्ये पुढे २ व मागे ३ असे एकूण पाच कॅमेरा आहेत!
मागील ३ कॅमेरांमध्ये मुख्य 12MP f/1.5 असलेला कॅमेरा ज्याची लेन्स optically stabilized असून 78-degree field of view आहे.
त्यानंतर दुसरा कॅमेरा 16MP सुपर वाईड 107 degree असून f/1.9 aperture लेन्स यामध्ये आहे. यामुळे वाईड म्हणजे अधिक मोठं दृश्य टिपता येईल.
आणि तिसरा कॅमेरा टेलिफोटो लेन्स असून यामुळे दुप्पट झूम करता येणार आहे. ही लेन्स 12-megapixels , 45 degree, f/2.4 असलेली आहे.
पुढे फ्रंट कॅमेरामधील पहिला सेल्फी कॅमेरा 8MP 80-degree, f/1.9 लेन्स असलेला आहे. आणि यासोबत असलेला दुसरा कॅमेरा जो सेल्फी काढताना वाईड फोटो काढण्यासाठी उदा ग्रुप सेल्फी 5MP असलेला 90-degree, f/2.2 लेन्स आहे.