अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर बॅटल ग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) आता भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होत आहे. PUBG Mobile वर चीनसोबत झालेल्या वादानंतर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून या गेमचे चाहते या गेमची वाट पाहत होते. ज्यांनी Pre-Register केलं होतं त्यांच्यापैकी काही जणांना ही गेम आता प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आताही ही गेम Early Access मध्येच आहे. प्रि रजिस्टर सुरू केल्यावर २ आठवड्यातच तब्बल २ कोटी युजर्सनी नोंदणी केली होती!
BGMI गेमची अधिकृत प्ले स्टोअर लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
PUBG Mobile चा आधीचा गेम डेटा या नव्या गेममध्ये Migrate करण्याची सोय देण्यात आली आहे त्यामुळे तुमच्याकडे आधी असलेल्या Skins इथेही उपलब्ध होतील. त्यासाठी Krafton ने Proxima Beta Pte. Limited मार्फत पर्याय दिला आहे. तुम्ही गेम इंस्टॉल करून सुरू केली की तसा पॉप अप आलेला दिसेल.
या पॉपमध्ये “Welcome! We can help transfer your data from us (Proxima Beta Pte. Limited), the operator of PUBG Mobile Nordic Map: Livik, to KRAFTON Inc, the operator of the New App, so that you can use such data in the New App. Please note that after December 31, 2021, such transfer will no longer be possible.” असा मेसेज देण्यात आला आहे.
तुम्ही pre register केलं असेल आणि तरीही तुमच्याकडे गेम इंस्टॉल करण्याचा पर्याय दिसत नसेल तर तुम्हाला आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. ही गेम हळू हळू उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावेळी त्यांनी खास भारतासाठी काही पर्याय आणि बंधने घालून दिली आहेत जेणेकरून त्यामधील हिंसा कमी असेल आणि प्लेयर्स यावर मर्यादित वेळच घालवू शकतील.
या गेमची iOS आवृत्ती अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आयफोन यूजर्सना आणखी काही काळ वाट पहावी लागेल.
Search Terms : Battlegrounds Mobile India (BGMI) Now Available for Pre-Registered Users on Google Play Store, with data transfer from PUBG Mobile