वनप्लस या कंपनीने त्यांच्या स्वस्त फोन्सच्या नॉर्ड मालिकेत नवा Nord CE 5G फोन सादर केला आहे. सध्या उपलब्ध फोन्स पैकी वनप्लसचा हा सर्वात स्वस्त फोन असेल. यामध्ये Snapdragon प्रोसेसर, 5G सपोर्ट, ट्रिपल कॅमेरा मिळेल. यासोबत वनप्लसने त्यांची U1S TV Series अंतर्गत नवे टीव्हीसुद्धा सादर केले आहेत.
Nord CE 5G मध्ये .43-inch Fluid AMOLED 90Hz डिस्प्ले, Snapdragon 750G प्रोसेसर, 4500mAh 30T Plus Warp Charge, 64MP Triple Camera मिळेल. वनप्लसने किंमतीच्या बाबतीत पुन्हा एकदा काहीशी निराशा केली आहे असं मत व्यक्त करण्यात येत आहे. सॉफ्टवेअर वगळता या फोनपेक्षा अधिक सुविधा या किंमतीत इतर ब्रॅंडसचे अनेक फोन्स देत आहेत. शिवाय यामध्ये 5G चा केवळ एकच बॅंड देण्यात आला आहे. ज्यामुळे 5G च्या सुविधा पूर्ण क्षमतेने वापरता येणार नाहीत. हा फोन १६ जून पासून मिळेल. याच्या प्रिऑर्डर उद्यापासून सुरू होत आहेत.
OnePlus U1S टीव्ही मालिकेत 4K UHD, HDR10+, 30W Dolby Audio, OxygenPlay 2.0, OxygenConnect 2.0, Android 10 अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यांची किंमत ₹39,999 (50″), ₹47,999 (55″), ₹62,999 (65″) अशी असणार आहे.