भारतात कुठेही 5G सेवा सुरू झालेली नसताना 5G फोन्स सादर करण्याची स्पर्धा सुरू आहे. इतर ब्रॅंड्सचे स्वस्त 5G फोन्स आल्यानंतर आता सॅमसंगनेही Galaxy M42 5G या नावाचा स्वस्त 5G फोन काल भारतात सादर केला आहे. हा फोन बाहेरच्या देशात A52 5G नावाने आला होता.
या फोनमध्ये 6.6-inch HD+ AMOLED डिस्प्ले, 48MP+8MP+5MP+5MP कॅमेरा, 20MP फ्रंट कॅमेरा, Snapdragon 750G प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरी मिळेल.
या फोनमध्ये किंमतीनुसार किमान 90Hz डिस्प्ले द्यायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. या फोनवर HDFC Credit Card आणि EMI वर २००० कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे हा फोन त्या ग्राहकांना १९९९९ रुपयात मिळेल. हा फोन १ मे पासून दुकानांमध्ये व ऑनलाइन उपलब्ध होईल.