नमस्कार,
मराठी वेबविश्वात मराठी लोकांना टेक्नॉलजीच्या जगतातील ताज्या घडामोडींबद्द्ल माहिती मिळावी आणि सोप्या टिप्स & ट्रिक्स मराठीमध्ये वाचायला मिळाव्यात या उद्देशाने ह्या ब्लॉगची सुरवात केली होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आज मराठीटेकची वाचकसंख्या १,००,००० पार गेली आहे. आणि यासोबत “मराठीटेक” मराठी मधला सर्वात वेगाने वाढणारा ब्लॉग ठरला आहे. मराठीटेक हा ब्लॉग स्वतःच अॅप्लिकेशन प्रसिद्ध करणारा पहिलाच ब्लॉग! त्यालासुद्धा आपणा सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. (५०००+ यूजर)
मात्र आजपर्यंत हा ब्लॉग Ads मुक्त राहिलाय. त्यामुळे आम्हाला कोणताही उत्पन्नाचा मार्ग नाही. काही वेळा आर्थिकदृष्ट्या काही प्रकल्प बंद होतात. मात्र आम्हाला तसे न करता मराठीटेकला आणखी पुढेच न्यायचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हा सर्वांना मदतीच आवाहन करत आहोत…
मदतसुद्धा फूल न फुलाची पाकळी अशीच मागतोय !
तुम्हाला शक्य असेल अथवा जेव्हढी मदत करण्याची इच्छा असेल तेव्हढी मदत तुम्ही देऊ शकता अगदी १० रुपयापासून! यासाठी आम्ही सोपा मार्ग निवडलाय..
Paytm नावाची मोबाइल/DTH रीचार्ज करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाइट आपणा सर्वांना माहीत असतेच. तर या Paytm च्या Send Money या सुविधेचा वापर करून आम्हाला मदत करा.
त्यासाठी सूचना खालील प्रमाणे
- प्रथम Paytm अॅप्लिकेशन डाऊनलोड करा
- जर वॉलेट मध्ये बॅलेन्स नसेल तर Add Money या पर्यायाचा वापर करून Wallet मध्ये पैसे घाला.
- हे पैसे पूर्णतः सुरक्षित असतील व यापुढे जेव्हा तुम्हाला रीचार्ज करायचा असेल तेव्हा वापरता येतील.
- यानंतर Send Money वर क्लिक करा
- आता खालील कोड स्कॅन करा. व किती मदत द्यायची आह ती रक्कम टाका.(रु. १०/२०/३०/४०…. तुमच्या इच्छेनुसार)
MarathiTech Paytm Donate QR Code - Comment बॉक्स मध्ये MarathiTech Trasnfer व तुमचे नाव लिहा *
- आणि क्लिक करा Send Money ह्या निळ्या बटनवर … आणि धन्यवाद तुमची मदत आम्हाला लगेच मिळेल!
तुम्ही Enter Amount बॉक्स मध्ये जेव्हढी रक्कम लिहाल तेव्हढीच रक्कम तुमच्या वॉलेट मधून घेतली जाईल .