अनेक दिवस चर्चा सुरू असलेले realme 8 मालिकेतील फोन्स काल झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात सादर करण्यात आले असून यामध्ये realme 8 व realme 8 Pro या फोन्सचा समावेश आहे. रियलमीने 8 Pro मध्ये चक्क 108MP चा कॅमेरा दिला आहे.
दोन्ही फोन्समध्ये जुनाच Snapdragon 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय अलीकडेच आलेल्या रियलमीच्याच जवळपास याच किंमतीत मिळणाऱ्या फोनसोबत यांचीच स्पर्धा असणार आहे! इतक्या वेगात रियलमी फोन्स आणत आहे की त्यांना आपण स्वतःच्याच फोन्सना विनाकारण अनेक पर्याय देत आहोत याचंही भान राहिलेलं नाही! अनेकांनी Xiaomi च्या Redmi Note 10 मालिकेतील फोन्स अधिक चांगला पर्याय आहे असं मत व्यक्त केलं आहे. शिवाय सॅमसंगचेही नवे पर्याय आहेतच.
realme 8 : या फोनमध्ये 6.4″ FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट, MediaTek Helio G95 प्रोसेसर, 4GB/8GB रॅम, 128GB स्टोरेज, 64MP+8MP+2MP+2MP असा कॅमेरा सेटप, 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 30W चार्जिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
याची किंमत १४९९९ (4GB+128GB), १५९९९ (6GB+128GB), १६९९९ (8GB+128GB) अशी असणार आहे.
realme 8 Pro : या फोनमध्ये 6.4″ FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट, Snapdragon 720G प्रोसेसर, 6GB/8GB रॅम, 128GB स्टोरेज, 108MP+8MP+2MP+2MP असा कॅमेरा सेटप, 16MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी, 50W चार्जिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 50W सपोर्ट असला तरी रियलमीने 65W चा चार्जर बॉक्समध्ये दिला आहे!
याची किंमत १७९९९ (6GB+128GB), १९९९९ (8GB+128GB) अशी असणार आहे.
realme Smart Scale : रियलमी त्यांच्या इंटरनेट ऑफ थिंग्ज साठीच्या स्मार्ट होम उपकरणात आता वजनकाटा सुद्धा आणला आहे. यामध्ये १६ प्रकारे वजन मोजणी केली जाते. हा वापरत असताना हार्टरेट सुद्धा पाहता येईल. याची किंमत १९९९ असणार आहे.
realme Smart Bulb : रियलमी त्यांच्या इंटरनेट ऑफ थिंग्ज साठीच्या स्मार्ट होम उपकरणात आता स्मार्ट बल्ब सुद्धा आणला आहे. यामध्ये 9W आणि 12W असे पर्याय असणार आहेत. गूगल असिस्टंट आणि अलेक्सा या दोन्हीचा सपोर्ट असेल. याची किंमत ७९९ (9W) आणि ९९९ (12W) असणार आहे.