काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेला हा vanish mode आता उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असून याद्वारे पाठवलेले मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचून झाले की आपोआप डिलिट होतील! हे मेसेज त्यांनंतर कुठेही दिसणार नाहीत. ही सोय आता इंस्टाग्राम आणि मेसेंजरमध्येही देण्यात आली आहे.
स्नॅपचॅट मधील आणखी एक सोय इंस्टाग्रामने यावेळी उचलली असून आपण पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला आता ते चॅट बंद केलं की तो मेसेज गायब होईल. काही वेळा काही जणांना अशा गोष्टी शेयर करायच्या असतात ज्या फक्त एकदाच पाहणं अपेक्षित असतं किंवा त्या समोरच्याने साठवणं अपेक्षित नसतं. अशा वेळी हा मोड उपयोगी पडेल.
हा मोड वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चॅट मध्ये असताना फक्त स्वाईप अप करायचं आहे. परत नॉर्मल मोडला जायच असेल तर परत स्वाईप अप केलं की नेहमीच्या चॅट हिस्ट्री ठेवली जाईल अशा मोडला जाता येईल. प्रायव्हसीसाठी ही सोय आणल्याचं फेसबुकतर्फे सांगण्यात येत आहे पण त्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं!
या मेसेजेसचा समोरच्या व्यक्तीने स्क्रीनशॉट काढल्यावरही कळेल! होय DM करत असताना जर समोरच्या व्यक्तीने स्क्रीन शॉट काढला तर त्यांना कळवलं जाईल किंवा तुम्ही स्क्रीन शॉट काढला तर त्यांना कळवलं जाईल! त्यामुळे या मोडमध्ये असताना स्क्रीनशॉट काढण्यापूर्वी काळजी घ्या. स्क्रीनशॉटबद्दल काळवण्याची ही सोय फक्त vanish mode मध्ये असतानाच वापरली जाईल.
हा व्हॅनिश मोड हळूहळू रोलआउट केला जात असून येत्या काही दिवसात अपडेटद्वारे तुम्हाला उपलब्ध होईल.