कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ‘ विंडोज ८ ‘ ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली .
विंडोज यूजरना ‘ विंडोज ८ ‘ साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले
. गॅजेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे जगातील अग्रेसर आयटी कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने भारतात ‘विंडोज- 8’ लॉन्च केले आहे. गेल्या 17 वर्षांमध्ये लॉन्च केलेल्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ‘विंडोज- 8’ हे नवे आणि अद्ययावत आहे. जगभरातील रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना शुक्रवारपासून ‘विडोंज- 8’ उपयोगात आणता येईल.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर यांनी सांगितले की, ऑफरनुसार ग्राहकांना विंडोज- 8 सोबत अनेक अॅप्लीकेशन मिळणार आहेत. तसेच कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि टॅबलेट्सला डोळ्यांसमोर ठेवून ‘विंडोज-8’ विकसित करण्यात आले आहे.
इझी टू यूज- स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर काम करणार्यांसाठी इझी टू यूज हे फीचर फायदेशीर आहे. अप इन क्लाउड- ‘विंडोज 8’मध्ये आपल्याला अनेक इंटरनेट सुविधा मिळतील. त्या माध्यमातून तुम्ही स्काय ड्राइव्ह सारखे क्लाउड स्टोरेजचा उपयोग करू शकता.
जर तुम्ही XP, विस्टा आणि विंडोज-7 ला कंटाळले असाल तर तुम्ही विंडोज-8चा पर्याय निवडू शकतात. ते ही अवघ्या 699 रूपयांत. ‘विंडोज-8’ हा पर्याय निवडण्यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ती म्हणजे, तुमचे कॉम्प्युटर 2 जून 11 ते 31 जानेवारी 12 या कालावधीत खरेदी केलेले असावे. याशिवाय अन्य ग्राहकांना विंडोज- 8 ने आपले डिव्हाइस अपग्रेड करण्यासाठी 1,999 रुपये मोजावे
दीर्घकाळ चालणारी बॅटरी , वेगवान बूटिंग , लहान मेमरी याबरोबर ‘ विंडोज ७ ‘ च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरना ‘ विंडोज ८ ‘ पूरक असणार आहे . माउस , की – बोर्ड आणि टचबरोबर काम करता येऊ शकेल , असेयाचे डिझाइन आहे आणि हेच या ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य आहे . ‘ विंडोज ८ ‘ आणि ‘ सरफेस टॅब्लेट ‘ ची विक्री शुकव्रारपासून सुरू होणार आहे .
सध्याच्या स्टार्ट मेनू आणि आयकन्सच्या पलीकडचा विचार करून ‘ विंडोज ८ ‘ चा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे . अॅप्लिकेशनच्या अपडेट्सची माहिती यावरून मिळू शकणार आहे . टचस्क्रीनचा लक्षात घेऊन यावरील टाइल मोठ्या करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ‘ टच ‘ करणे सोपे जाणार आहे . स्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यासाठी ऑयकॉन आपोआप झाकला जातो .यापूर्वी लाँच झालेल्या काहीऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता . विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री – लाँचसाठी प्रयत्न केले आहेत . मात्र ,कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे .