अतिशय दिमाखात ‘ विंडोज ८ ‘ लाँच झाली. त्यात टचस्क्रीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने जुन्या चांगल्या स्थितीतील कम्प्युटरवर ‘ विंडोज ८ ‘ च्या या फीचरचा उपयोग नव्हता आणि या फीचरशिवाय ‘ विंडोज ८ ‘ वापरणे म्हणजे हिरो , हिरॉइन नसलेला चित्रपट पाहणे. ग्राहकांची ही तक्रार लक्षात घेऊन कम्प्युटर कंपन्यांनी नवे डिजिटल पेन तयार केले आहे. मॉनिटरचे स्क्रीन त्यामुळे ‘ टच स्क्रीन ‘सुविधा वापरण्याजोगे होणार आहेत. टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरना हा शोध नवसंजीवनी देईल का , हे आगामी काळच ठरवेल. या पेनमुळे ‘ विंडोज ८ ‘वरील वेगवेगळ्या कमांडना ‘ टच स्क्रीन ‘ द्वारे स्वाइप करण्याची गंमत आता प्रत्येकालाच अनुभवता येईल. डिजिटल पेन ‘ कॉस्ट इफेक्टिव्ह ‘ ही ठरणार आहे. नवा टच स्क्रीनचा मॉनिटर घेण्यापेक्षा हे डिजिटल पेन घेणे केव्हाही फायद्याचे ठरणार आहे.
डिजिटल पेन काय आहे ?
हे केवळ ‘ ई- फन ‘ आहे. कॅलिफोर्नियामधील ‘ वेस्ट कोव्हिया ‘ या कंपनीने हे कॉर्डलेस पेन तयार केला आहे. ‘ अॅपेन टच ८ ‘ असे त्याचे नाव आहे. एका अॅटॅचमेंटद्वारे कम्प्युटरच्या यूएसबी पोर्टमध्ये घालून याचा वापर करता येईल.
हे कसे काम करते ?
पेनला जोडण्यात आलेली ‘ अॅटॅचमेंट ‘ इन्फ्रारेड आणि अल्ट्रासॉनिक सिग्नल रिसीव्ह करण्याचे काम करते. पेनमधून इन्फ्रारेड किरण बाहेर पडतात. रिसीव्हर हा सिग्नल कम्प्युटरपर्यंत पोहोचवतो आणि टच स्क्रीनने संबंधित क्रिया करतो , तशी अगदी नेमकी स्थिती येथे तयार होते. हे पेन घड्याळाला जे सेल वापरतात , त्यावर चालते आणि ते पाचशे तास वापरता येते आणि नंतर बदलताही येते.
सारे काही डेस्कटॉप कम्प्युटरसाठी
टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचा वापर अधिकाधिक व्हावा , यासाठी कंपनीकडून असे प्रयत्न करण्यात येत आहेत. या पेनमुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचाही वापर टच स्क्रीनसारखा करता येणार आहे.
बाजारात कधी येणार ?
या वर्षी मार्च महिन्याअखेरीस उत्तर अमेरिकेत हे पेन बाजारात येईल. त्याची किंमत ८० डॉलर्स असेल.

ADVERTISEMENT