नोकीया या फोन ब्रॅंडची मालकी घेतल्यापासून HMD Global ने बऱ्याच जुन्या लोकप्रिय फोन्सना नव्या रूपात सादर केलं आहे. आता त्यांनी एकेकाळी बऱ्याच गाजलेल्या Nokia 5310 XperssMusic फोनला नव्याने पुन्हा बाजारात उपलब्ध करून दिलं आहे! हा फोन ऑगस्ट २००७ मध्ये सादर करण्यात आला होता. नवा Nokia 5310 बाहेरच्या देशात मार्चमध्येच सादर झाला होता मात्र भारतात येण्यास याला जून महिना उजडावा लागला! हा फोन ड्युयल सिम असून यामध्ये एका चार्जवर तब्बल २२ दिवस चालणारी बॅटरी देण्यात आली आहे!
Nokia 5310 हा एक फीचर फोन असून यामध्ये MP3 प्लेयर आणि वापरलेस एफएम रेडियो देण्यात आला आहे. यामध्ये स्वतंत्र म्युझिक बटणे असून ड्युयल स्पीकर्ससुद्धा आहेत! मागे एक कॅमेरा आणि फ्लॅश आहे.
हा फोन ३३९९ या किंमतीत भारतात आला असून आजच्या काळात फीचर फोन्स असूनही इतकी जास्त किंमत ठेवणं अनेकांना पटलेलं नाही. हा फोन खरेदी करणारा वर्ग प्रामुख्याने नोकीयाची जुनी आठवण म्हणून घेणारा किंवा वयोवृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना स्मार्ट फीचर्सची गरज नाही किंवा इंटरनेटच्या विश्वापासून दूर ठेवणारा फोन हवा आहे असाच असेल. हा फोन ब्लॅक रेड आणि व्हाइट रेड या रंगात उपलब्ध आहे. हा फोन अॅमेझॉनवर २३ जूनपासून तर ऑफलाइन दुकानांमध्ये २२ जुलै पासून मिळेल!
डिस्प्ले : 2.4-inch QVGA (240×320 pixels) display
प्रोसेसर : MediaTek MT6260A
रॅम : 8MB
स्टोरेज : 16MB + expandable up to 32GB
कॅमेरा : VGA camera with Flash
बॅटरी : 4440mAh 55W SuperFlash Fast Charge कॅप्सुलसारख डिझाईन
ऑपरेटिंग सिस्टिम : Series 30+
इतर : Bluetooth v3.0, Micro-USB port, and a 3.5mm headphone jack
रंग : Black Red, White Red
किंमत : ₹ ३३९९
तुमच्या आर्टिकल मुळे कळलं की नोकिया अजून बटण च्या फोन मध्ये टिकून आहे.
आपले खूप आभार आम्हाला माहिती provide केल्याबद्दल.