अडोबी फॉटोशॉप कॅमेरा हे ॲप आता सर्व अँड्रॉइड व iOS यूजर्ससाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गेले काही महिने याची ठराविक फोन्सवरच चाचणी सुरू होती. मात्र आता हे Adobe Photoshop Camera ॲप उपलब्ध होत आहे.
या ॲपमध्ये अडोबीच्या सेन्सई नावाच्या प्लॅटफॉर्मची जादू आहे. या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित प्लॅटफॉर्ममुळे फॉटोशॉप कॅमेरा ॲपला अनेक सुविधा उपलब्ध करून देता येत आहेत ज्या शक्यतो त्यांच्या डेस्कटॉप सॉफ्टवेअरमध्ये पाहायला मिळतात. या ॲपद्वारे तुम्ही फोटो काढू शकता, एडिट करू शकता त्यावर लेन्स अप्लाय करू शकता!
डाउनलोड लिंक :
Download Adobe Photoshop Camera from Google Play (Android)
Download Adobe Photoshop Camera from App Store (iOS)
इतर जाहिरातींनी भरलेली ॲप्स वापरण्यापेक्षा हा नक्कीच एक चांगला पर्याय म्हणता येईल. क्लाऊडवर फोटो साठवण्यासाठी मात्र या ॲपमध्ये पैसे द्यावे लागतील. काढलेला/एडिट केलेला फोटो तुम्ही तुमच्या फोनमध्ये मोफत साठवू शकाल किंवा शेयरसुद्धा करू शकाल.
फॉटोशॉप कॅमेरा ॲपमधील काही खास सुविधा :
- फिल्टर्स : Over 80 custom filters : Portrait, Studio Light, Bloom, Pop Art, Spectrum, Desync, Food, Scenery, Natural Skies, Analog, Night Shift, Comic Skies, Interstellar, Dreamcatcher, Celestial, Supersize, Double Expo, Prism, Color Echo, Mixed Media, Blue Skies, Artful, and more.
- रियल टाइम फॉटोशॉप इफेक्टस
- ऑटो टोन
- Content Aware Recommendations
- Portrait Controls
अजूनही हे ॲप प्ले स्टोअरवर काही जणांना device isn’t compatible असं दाखवत आहे. तूर्तास हे केवळ गूगल पिक्सल, सॅमसंग गॅलक्सी आणि नव्या वनप्लस फोन्सवर आधी येत असल्याचं दिसत आहे.
Search Terms : Adobe Photoshop Camera app now available for everyone to download free!
हे ऍप किरीन चिपसेट वर चालत नाही, माझ्या Honor View २० वर इनकॉम्पॅटिबल म्हणून येतंय.
बऱ्याच फोन्सना असं दिसत आहे. रोलआउट सुरू आहे त्यामुळे कदाचित असं होत असावं.