सोशलबेकर या अमेरिकन वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सध्या सुमारे फेसबुकचे ६ कोटी २७ लाख युझर्स असून , एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण केवळ ५.३५ टक्के आहे. त्या तुलनेत अमेरिका (५३.९७ टक्के) , ब्रिटन (५२.६५ टक्के) , तुर्कस्तान (४१.५९ टक्के) , मेक्सिको (३५.५१ टक्के) या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात फेसबुक युझर्स जास्त आहेत. सर्वाधिक युझर्सचा विचार करता अमेरिका (१६ कोटी ७४ लाख) आघाडीवर असून त्या पाठोपाठ ब्राझिल (६ कोटी ५२ लाख) आणि भारत यांचा क्रमांक लागतो. याच ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे डिसेंबरअखेर ब्रिटनमध्ये फेसबुकचे ३ कोटी २८ लाख युझर्स होते. गेल्या महिन्यात त्यातील ९ लाख ४६ हजार युझर्स कमी झाले. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यांची संख्या २.८८ टक्क्यांनी कमी झाली. तर अमेरिकेत ०.६९ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ०.६१ टक्के युझर्स घटले. त्याचवेळी ब्राझिलमध्ये ३.१८ टक्के तर भारतात २.४७ टक्के आणि तुर्कस्तानमध्ये ०.९८ टक्के युझर्स वाढले. सोशलबेकर्सचे सीईओ जन रेझाब यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटनमधील १५ टक्के नागरिक १३ वर्षाखालील आहेत. मात्र त्यांना फेसबुक लॉग-इन करण्याची परवानगी नाही. तसेच ६५ पेक्षा अधिक वय असणारे साडेसोळा टक्के नागरिक असून , त्यातील केवळ ४ टक्के व्यक्ती फेसबुकचा वापर करतात.
युझर्सची संख्या कमी होण्यामागे फेसबुकवरील माहितीच्या प्रायव्हसीसंदर्भात असलेला गोंधळ किंवा फेसबुकचा आलेला कंटाळा या गोष्टीदेखील असतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी मात्र ही बाब फेटाळलेली आहे. ठराविक कालावधीनंतर अशा बातम्या येतच असतात. जाहिरातींसाठी दिलेल्या माहितीमधून ही माहिती घेतलेली असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यामध्ये किती व्यक्तींपर्यंत जाहिराती पोहोचतात अशी माहिती दिली जाते. मात्र यावरून फेसबुकच्या युझर्समध्ये किती वाढ झाली हे निश्चित सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. फेसबुक लवकरच एक नवे उत्पादन जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी प्रसिद्ध झाल्याने तातडीने फेसबुकने हा खुलासा केला.