ट्विटरने त्यांच्या सेवेमध्ये आता नवी सोय जोडली असून कालपासून ही भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात सुरुवात झाली आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवरील स्टोरीज प्रमाणेच ही काम करेल. या सुविधेद्वारे आपण शेयर केलेलं ट्विट, फोटो, व्हिडीओ २४ तासांनी गायब होतील. या सुविधेला ट्विटरने Fleets (फ्लीट्स) असं नाव दिलं आहे. ही सुविधा अपडेटद्वारे उपलब्ध करून दिली जात असून येत्या काही दिवसात सर्व iOS व अँड्रॉइड युजर्सना उपलब्ध होईल.
सर्वांना दिसणाऱ्या पोस्ट्स शेयर करण्यापेक्षा आता स्टोरीज टाकण्याकडे वाढलेला यूजर्सचा कल लक्षात घेऊन ट्विटरने हा बदल केला आहे. आधी स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप आणि आता ट्विटर असा प्रवास करत स्टोरीज सर्व ठिकाणी पोहचू लागल्या आहेत. यामुळे अपलोड करणाऱ्या व्यक्तीला लाईक्स, शेयर्स, रिट्विटची स्पर्धा, इतर यूजर्सच्या कमेंट्सचा होणारा त्रास होणार नाही. केवळ DM म्हणजे डायरेक्ट मेसेजद्वारेच त्या स्टोरीवर व्यक्त होता येईल. यावर अनेकांनी असंही मत मांडलं आहे लोक ट्विट्स ऐवजी स्टोरीज टाकण्यावर जास्त भर देतील!