मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .
ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .