प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाण्याचा काश्मिरी मातीचा गुणधर्म आहे. काश्मीरसाठी विशेष अँड्रॉइड अप्लिकेशन तयार करणाऱ्या २३वर्षीय मेहविश मुश्ताक या युवतीने खोऱ्यातील बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा चुणूक दाखविली आहे. खोऱ्यातील सरकारी आणि खासगी अशा ५०० महत्त्वाच्या विभागांबाबतची माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देणारे ‘डायल काश्मीर’ हे ‘ अॅप ‘ तयार करणारी मेहविश ही पहिली काश्मिरी ठरली आहे.
मेहविशने कंम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर , जानेवारीत तिने अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन डिझायनिंगबाबतचा ऑनलाइन अभ्यासक्रमाला अॅडमिशन घेतली. हा अभ्यासक्रम पूर्ण करताना एखादे प्रॅक्टिकल सादर करावे लागते. तिने काश्मिरसाठी उपयुक्त ठरणारे अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. स्वानुभव आणि आपण काहीतरी करू शकतो , या आत्मविश्वासातून ‘ डायल काश्मीर ‘ हे अॅप तयार केले. याबाबत तिने फेसबुकवर सविस्तर माहिती दिली आहे.
….. ………..
मला दुसरा क्रमांक मिळविणं आवडत नाही. मी नेहमीच पहिल्या क्रमांकावर असते. त्यामुळेच एका ऑनलाइन कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक प्रोजेक्ट करताना , काश्मीरसाठी विशेष अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो दोन आठवड्यात तडीस नेला.
– मेहविश मुश्ताक , इंजिनीअर युवती
Related Keywords : Kashmir, Andoid, App, Dial Kashmir, mehvish Mushtak