इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी पॅनासॉनिकने स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी 51 नावाचा स्मार्टफोन लाँच केला असून त्याची किंमत 25,900 रुपये आहे. पुढील आठवड्या तो बाजारात उपलब्ध होणार आहे. पी 51 च्या मार्केटिंगसाठी कंपनीने जेना समूहासोबत करार केला आहे.
पॅनासॉनिकचे एमडी मनीष शर्मा यांनी सांगितले की, आगामी वर्षभर स्मार्टफोनचे ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. 2015 पर्यंत कंपनीला भारतातून मिळणार्या एकूण उत्पन्नापैकी 50 टक्के वाटा स्मार्टफोन आणि टॅब्लेट श्रेणीचा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ऑगस्ट महिन्यापर्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच केले जातील. या उत्पादनांच्या किमती 6,990 ते 35,000 रुपयांपर्यंत असतील.
पॅनासॉनिक पी 51 वैशिष्ट्ये
ओएस : अँड्रॉइड जेलिबीन 4.2 ऑपरेटिंग सिस्टिम
5 इंच एचडी आयपीएस डिस्प्ले
1.2 गीगाहर्ट्झ स्पीडचा क्वॉडकोअर प्रोसेसर
2 जी आणि 3 जी सपोर्ट
हिंदी भाषेला सपोर्ट
2500 एमएचची बॅटरी
ड्युअल सिम कार्ड
4 जीबी इंटर्नल 32 जीबी एक्स्टर्नल मेमरी
8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा विथ एलईडी फ्लॅश
1.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (खास व्हिडिओ कॉलिंगसाठी)

ADVERTISEMENT