व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर आता डार्क मोड देण्यात आला असून अँड्रॉइड व iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील यूजर्ससाठी उपलब्ध झाला आहे. गेले काही महीने याची चाचणी सुरू होती. अनेक महीने यूजर्स याची मागणी करत होते. इतर अॅप्सच्या मानाने व्हॉट्सअॅपचा वापर जास्त असल्याने डोळ्यांना जास्त त्रास व्हायचा. डिस्प्लेवरील प्रखर लाइटमुळे डोळ्यांवर पडणारा ताण आता डार्क मोडमुळे कमी होईल. या मोड मध्ये काळा, करडा असे गडद रंग वापरुन डिझाईन केलेलं आहे. यासाठी आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप प्ले स्टोअर/अॅप स्टोअरमधून अपडेट करून घ्यावं लागेल.
व्हॉट्सअॅपवर डार्क मोड सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये Settings > Chats > Theme > select ‘Dark’ असा बदल करा.
व्हॉट्सअॅप OLED डिस्प्ले साठी खास पूर्ण काळ्या रंगात असणारा आणखी एक मोड आणण्याची शक्यता होती मात्र सध्यातरी तो पर्याय आलेला नाही.
डार्क मोड मुळे नेहमीच्या अंगवळणी पडलेल्या WhatsApp वापरास एक फ्रेश लुक मिळाला आहे. कमी प्रकाश असणाऱ्या ठिकाणी डोळ्यावर कमी ताण पडावा यादृष्टीने याची निर्मिती केली आहे. आणि अंधाऱ्या खोलीत तुमच्या फोनचा प्रखर लाईट चालू झाल्याने जी पंचाईत होते ती आता टळू शकेल असे आम्हाला वाटते. – WhatsApp अधिकृत पोस्ट
मराठीटेकतर्फे आम्ही एक आवाहन करत आहोत की जिथे शक्य असेल तिथे आपल्या फोन/लॅपटॉप मध्ये डार्क मोडचा वापर करा.
विंडोज १०, अँड्रॉइड, iOS अशा सर्व प्रमुख ऑपरेटिंग सिस्टममध्ये डार्क मोड देण्यात आला आहे. शिवाय गूगल, इंस्टाग्राम, क्रोम, यूट्यूब, फेसबुक अशा सर्व प्रमुख अॅप्समध्येही आता डार्क मोड उपलब्ध आहे. डार्क मोडमुळे डोळ्यांना सतत स्क्रीनपुढे राहिल्यामुळे होणारा त्रास बराच कमी होतो. शिवाय काही डिस्प्लेवर तर बॅटरीची सुद्धा बचत होते.
व्हॉट्सअॅप मराठीतसुद्धा वापरता येतं : अधिक माहिती : http://bit.ly/2Tj6JrN
Search Terms : Dark mode for WhatsApp now available for all iOS and Android Users How to enable dark mode on whatsapp