अॅमेझॉनने त्यांच्या आधीच बरीचशी उपकरणे उपलब्ध असलेल्या एको उत्पादनांच्या मालिकेत आता नवा स्मार्ट डिस्प्ले सादर केला आहे. Echo Show 8 हा एक अलेक्सा व्हॉईस असिस्टंटची जोड दिलेला ८ इंची टचस्क्रीन असलेला स्मार्ट डिस्प्ले आहे. याची किंमत भारतात १२९९९ अशी असून सुरुवातीला ऑफर अंतर्गत हा स्मार्ट डिस्प्ले प्रिऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ८९९९ रुपयात मिळणार आहे. याची प्रिऑर्डर कालपासून अॅमेझॉनवर सुरू झाली असून प्रि ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना हा एको शो २६ फेब्रुवारीपासून मिळेल.
Buy Echo Show 8 on Amazon : https://amzn.to/31FmnAt
Echo Show 8 सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आला होता मात्र तो आता भारतात उपलब्ध झाला आहे. या स्मार्ट डिस्प्लेमध्ये एचडी स्क्रीन, स्टिरिओ साऊंड आणि एक कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. सोबत देण्यात आलेल्या अलेक्सा व्हॉईस असिस्टंटद्वारे सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. गाणी लावणे, बातम्या ऐकणे, व्हीडीओ पाहणे, माहिती मिळवणे, स्मार्ट उपकरणे नियंत्रित करणे अशी कामे करता येतील. यामधील कॅमेरामुळे व्हीडीओ कॉल्ससुद्धा करता येणार आहेत.
- Skype द्वारे व्हीडीओ कॉल्स
- 8.0” touch screen डिस्प्ले
- 1MP camera with built-in shutter
- 2.0” (52 mm) neodymium speakers with passive bass radiator
- Amazon Prime Music, Saavn, Gaana, Hungama द्वारे गाणी
एको शो (Echo Show) आता ५.५ इंची, ८ इंची आणि १०.१ इंची आकारात उपलब्ध आहे.