http://www.amazon.in/
अॅमेझॉनचे हे मॉडेल सर्व भारतीय कायद्यांना अनुसरूनच तयार करण्यात आले आहे. देशभरात रिटेलर्ससाठी सर्व स्तरावर विश्वासार्ह सेल्स चॅनेल उपलब्ध करून देणे आणि ऑनलाइनच्या माध्यमातून त्यांची व्यवसायवृद्धी करणे हा आमचा उद्देश आहे , असे अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक अमित अग्रवाल यांनी सांगितले.
परदेशी इ-कॉमर्स कंपन्यांवर भारतात असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी तसेच ऑनलाइन रिटेलमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी अॅमेझॉन भारत सरकारबरोबर चर्चा करीत होती. यासंदर्भात कंपनीचे जागतिक उपाध्यक्ष पॉल ई मिसेनर यांनी गेल्या फेब्रुवारीत उद्योगमंत्री आनंद शर्मा यांचीही भेट घेतली होती. ऑफलाइन मल्टीब्रँड रिटेलसाठी नियम शिथिल केले तेव्हाच अशाचप्रकारची तरतूद ऑनलाइनसाठीही करण्यात आली.
रिटेल विक्रेत्यांची उत्पादने वेबसाइटवर प्रदर्शित करण्यासाठी ऑनलाइन कंपन्यांकडून त्याचे भाडे घेतले जाते. या पार्श्वभूमीवर ‘ अॅमेझॉन इंडिया ‘ ने ‘ फुलफिलमेंट ‘ हा एक वेगळा पर्याय समोर ठेवला आहे. ही सेवा घेणाऱ्या रिटेलर्ससाठी कंपनीने ‘ एन्ड टू एन्ड लॉजिस्टिक सोल्युशन ‘ चा पर्याय दिला आहे. . ‘ हेच मॉडेल अॅमेझॉन डॉट कॉमने अन्य देशांमध्ये उपयोगात आणले असून , त्याची पूर्तताही अॅमेझॉनने केली आहे ‘, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय विस्तार) ग्रेग ग्रीली यांनी दिली.
अॅमेझॉनने मुंबईच्या बाहेर आपली फुलफिलमेंट सेंटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे. या सेंटर्समध्ये माल साठवून ठेवता येणार आहे , तसेच अॅमेझॉनच्या स्वतःच्या कुरिअरने वा अन्य कुरिअरने त्याची डिलिव्हरीही करता येणार आहे.
‘ अॅमेझॉन डॉट इन ‘ ची स्पर्धा यांच्याशी…
भारतीय बाजारात ‘ अॅमेझॉन डॉट इन ‘ ला फ्लिपकार्ट , स्नॅपडील , होमशॉप१८ या देशी रिटेलर्सशी अटीतटीची स्पर्धा करावी लागणार आहे. ‘ जंगली डॉट कॉम ‘ च्या माध्यमातून अॅमेझॉन अगोदरच भारतीय बाजारात आहे. हे पोर्टल कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीत सुरू केले होते. जंगली डॉट कॉमच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करतानाच विक्रेत्यांच्या वेबसाइटवर व्हिजिटर्स पाठवण्याचे कामही हे पोर्टल करते
Related Keywords :
Amazon brings services to india
Amazon India shop books movies
Dilivari boys office.