फेसबुकचं Clear History टूल आता सर्व देशांमध्ये उपलब्ध झालं असल्याचं संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे जाहीर केलं आहे. हा पर्याय त्यांच्या Off Facebook Activity अंतर्गत जोडलेला पाहायला मिळेल. या टूलमुळे युजर्स फेसबुकच्या बाहेर असताना दुसऱ्या कोणत्या वेबसाइट्सवर तुम्ही केलेल्या अॅक्टिविटी फेसबुकसोबत शेयर केल्या आहेत ते समजेल. ते पाहून आपण दुसऱ्या साइट्स सोबत शेयर होत असलेला सर्व इतिहास पुसून टाकू शकतो.
Link : facebook.com/off_facebook_activity
वरील लिंकवर जाऊन कोणकोणत्या वेबसाइट्सनी आजवर तुमची त्या वेबसाइटवरील अॅक्टिविटी फेसबुकसोबत शेयर केली आहे ते समजेल. तिथून तुम्ही ती Clear History हा पर्याय वापरुन डिलिट करू शकाल. (Settings > Your Facebook Information > Off-Facebook Activity)
तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्या साईटवर पाहिली किंवा सर्च केली असता काही क्षणानंतर त्या संबंधी जाहिराती तुम्हाला फेसबुकवर दिसू लागतात ह्याचं कारण हेच असतं की ही माहिती त्या वेबसाइट्स फेसबुकसोबत शेयर करतात.
केंब्रिज अनॅलिटिका प्रकरणानंतर फेसबुकने जाहीर केलेलं ही टूल आता सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं असून यामुळे फेसबुकच्या यूजर्सची प्रायव्हसी जपण्यात मदत होईल असा दावा फेसबुकने केला आहे. त्यात कितपत तथ्य आहे आणि त्यांच्या आधीच्या घटनांमुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा का हा वेगळा प्रश्न…
कालच जाहीर झालेल्या माहितीनुसार फेसबुकने २५० कोटी यूजर्सचा टप्पा ओलांडला आहे! यासोबत त्यांनी त्यांच्या आर्थिक कामगिरीचीही माहिती प्रसिद्ध केली मात्र यानंतर काही तास फेसबुकचे शेयर ७% टक्क्यांनी खाली आले होते!
Search Terms Clear History Facebook Privacy Tool now available to everyone