फेसबुक हे व्यक्त होण्याचं साधन झालं आहे. वैयक्तिक आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर इथे मत दिलं जातं. त्या मतांमध्ये जाणवतो तारतम्याचा अभाव , म्हणून निधनाची बातमीही ‘लाइक ‘ केली जाते.
सोशल नेटवर्किंग साइट्स हा व्यक्त होण्याचं मोठं माध्यम बनून गेल्या आहेत. त्यामुळेच आपल्या ,आपल्या मित्रांच्या आयुष्यात तसंच समाजात घडणाऱ्या घटनांवर इथे मतं व्यक्त केली जातात. मतमतांतरं होतं. वाद झडतात. हे सारं होतं , म्हणूनच ही माध्यमं जिवंत राहातात. इथे इतरांनाही यावंसं वाटतं. फक्त हे सारं करताना तारतम्य सुटतं आहे की काय , असं वाटतं. फेसबुकवर जास्त वाटतं. फेसबुकवर आपल्याला एखादी पोस्ट लाइक किंवा डिसलाइक करता येते. त्यावर कमेंटही करता येते. लाइक किंवा डिसलाइक करणं सोपं आहे आणि त्यामुळेच गडबड होते आहे. एखाद्या दुःखद पोस्टवरही लाइक्स पडतात , तेव्हा आपल्यातलं तारतम्य हरवलं की काय , असं वाटून जातं. ‘ चिंटू ‘ कार प्रभाकर वाडेकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर ही बाब प्रकर्षानं दिसली. ही बातमी ‘ लाइक ‘ करणाऱ्यांना त्यातून वेगळं काही सुचवायचं नव्हतं. तेही त्या दुःखात सहभागी होते ; पण सहवेदना दाखवण्याची पद्धत अगदीच चुकली. अशा चुका मागे घेता येत नाहीत आणि त्यातून नुकसान घडून जातं.
न समजल्यामुळे
असं ‘ लाइक ‘ कोणी जाणूनबुजून केलं नाही. ते करणाऱ्यालाही दुःख झालेलं असतं. पूर्वी +१ अशी कमेंट द्यायचे. ही कमेंट ऑर्कुटवर जास्त असायची. फेसबुकनं लाइकची सोय केल्यामुळे ते करणं सुरू झालं. अर्थात , अशा प्रसंगी आरआयपी ही छोटीशी कमेंट टाकता येते. लाइक करणाऱ्यांना लगेचच कमेंटमध्ये कोणीतरी झापलेलंही असतं. हळूहळू असे लाइक्स नक्की कमी होतील.
– अमृता कुलकर्णी
गडबड होते
एक किस्सा सांगतो. मागच्या गणपतीत आमच्या बिल्डिंगमध्ये भजनाचा कार्यक्रम होता. आम्ही सगळे मित्र मागच्या ओळीत बसलो होतो. भजनं खरंच सुंदर चालली होती. त्या गायकाचं ‘ मैं नहीं माखन खायो ‘ आमच्यातल्या एकाला फार आवडलं आणि तो गायक समेवर येताना यानं खणखणीत शिट्टी मारून दाद दिली. तो गायकही दचकला आणि बाकीचे सगळेच! ‘ मला फार आवडलं , म्हणून मी शिट्टी मारली ,’ असं त्याचं प्रामाणिक स्पष्टीकरण होतं. त्याची दाद मनापासूनचही होती. पद्धत चुकली. ‘ लाइक ‘ च्या बाबतीत तेच होत असावं. दुःखद घटनांच्यावेळी आपली सहानुभूती दाखवायची असते. कमेंट करता येत नाही किंवा सुचत नाही. त्यामुळेच चटकन लाइक केलं जात असावं.
– योगेश जाधव
सवय झाली आहे
हल्ली फेसबुकवर कोणत्याही गोष्टीला ‘ लाइक ‘ करणं ही सवय झाली आहे. दिसलं लिखाण की कर लाइक , फोटो पाहिला की कर लाइक अशी मनोवृत्ती झाली आहे. जरासा मोकळा वेळ मिळाला , की मोबाइल किंवा पीसीवर फेसबुक सुरू करायचं आणि दिसेल त्या गोष्टीला पटापटा लाइक करायचं हा दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग झालाय. हे अर्थातच चुकीचं आहे. ‘ लाइक ‘ करताना किमान भान बाळगलंच पाहिजे. काहींना असंही वाटतं , की आपण इतरांच्या फोटो- कमेंट्सना लाइक केलं म्हणजे ते ही आपल्या कमेंटना लाइक करतील. म्हणूनसुद्धा ढोबळपणे लाइक केलं जातं. मला वाटतं ,प्रत्येकानंच असं लाइक करताना थोडंतरी तारतम्य बाळगलं पाहिजे.
कुणाल वंजारे

ADVERTISEMENT