तुम्हाला प्रचंड आनंद झालाय ? नव्या नोकरीचं किंवा लग्न ठरल्याचं जबरदस्त सेलिब्रेशन करण्याची इच्छा आहे ?मित्राच्या अत्यंत फालतू विनोदावर तुम्हाला
उलटी येतेय ? मग वाट कसली बघताय ? जे वाटतंय , ते करून मोकळे व्हा. फक्त स्माइलीतून!
अलीकडे बहुतांशी सगळ्याच सोशल नेटवर्किंग साइट्सवर आणि मोबाइल फोनच्या विविध अॅप्लिकेशन्सवर विविध प्रकारचे भाव व्यक्त करणाऱ्या स्माइली सहज उपलब्ध झालेल्या आहेत. तरुणांकडून त्यांचा वापरही तुफान होत असतो. या स्माइलीत प्रकारही पुष्कळ आहेत. ‘ प्रिकली पिअर ‘ म्हणजे काटेरी पेर किंवा निवडुंगासारखी दिसणारी ही झाडं एकमेकांना मिठ्या मारून बसलेली असतात. कुंडीतल्या कुंडीत वाकुल्या दाखवतात. तोंड वेंगाडून खिल्लीही उडवतात. ‘ मँगो ‘ नावाची मांजर ढसाढसा रडते , तर ‘ पुशीन ‘ नावाची मनी ‘ मी आत्ता अंघोळ करते आहे ‘ हे सांगण्यासाठी थेट बाथटबमध्ये जाऊन बसते.
नापोली आणि मीप
तुम्हाला मैत्रीणीला प्रपोज करायचं असेल , तरी गुलाबाचं फूल किंवा चक्क बदामाच्या आकाराचं हृदय हातात घेतलेली ‘ नापोली ‘ तुमच्या सेवेस हजर असते. ‘ मीप ‘ चिडतो किंवा खळाळून हसत सुटतो आणि ‘ बीस्ट ‘ हा कुत्रा पाठीवर सॅक घेऊन सहलीला निघतो किंवा घडाळ्याकडे पाहात कंटाळा आल्याचे हावभाव दर्शवतो.
कॅरेक्टर्सशी जवळीक अधिक
पूर्वी मोबाइलवर किंवा सोशल नेटवर्किंग साइटवर ‘ इमोशन्स ‘ हा एकच विभाग असायचा. आता त्यात विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट व्यक्तिरेखाही जोडल्या गेल्या आहेत. याच ‘ स्माइली ‘ तरुणांना प्रचंड आवडतात. यासंदर्भात फर्ग्युसन कॉलेजच्या विज्ञानशाखेचा विद्यार्थी अश्विन वरुडकर म्हणाला , ‘ आपण चॅट करतो म्हणजे लिहून बोलतो. त्यातल्या काही भावना या शब्दांतून नीट व्यक्त होतातंच असं नाही ; कारण चॅटिंग करताना ती व्यक्ती समोर नसते. अशा वेळी एखाद्या वाक्यातून गैरसमज होऊ नये , म्हणून स्माइलीचा वापर केला जातो. ‘
बोलण्यातला सूर कळावा , म्हणून…
ग्रुपमधल्या एका मैत्रीणीला आम्ही सगळेच जण ग्रुप चॅटिंगदरम्यान तिच्या जाडीवरून चिडवत होतो. आता मुली केवढ्या ‘ फिगर कॉन्शस ‘ असतात हे काही वेगळं सांगायला नको ; पण तिला त्या चिडवण्यातली मस्करी समजावी आणि तिनं ते खेळीमेळीनंच घ्यावं. त्यावरून कुणावर रागावू नये , यासाठी आम्ही सगळ्यांनीच वेगवेगळी ‘ कॅरॅक्टर्स’ तिला पाठवली. कुणी जीभ बाहेर काढलेली ‘ पुशीन ‘ पाठवली , तर कुणी डोळा मारणारा ‘ मीप ‘. त्यामुळे ती चिडण्याऐवजी उलट हसायलाच लागल्याचं मानसी जोशीनं सांगितलं.
परिपूर्ण आणि वेगवान
कोणताही संवाद हा त्यातला नेमका अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचला , तरच खऱ्या अर्थानं सकस आणि परिपूर्ण होतो. सोशल नेटवर्किंग साइट असो किंवा मोबाइल… चॅटिंग करताना व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसते. त्यामुळे बोलण्याचा नेमका सूर पोहोचवण्यासाठी ‘ स्माइली ‘ केव्हाही अधिक सोयीच्या वाटतात. सुरुवातीच्या फक्त गोल आकाराच्या ‘ इमोशन्स ‘ सगळेच अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचवू शकायच्या नाहीत. त्या ग्रुपचॅट दरम्यान परिपूर्ण नव्हत्या. त्यामुळे विविध ‘ कॅरेक्टर्स ‘ घेऊन आलेल्या ‘ स्माइली ‘ तरुणांना अधिक आपल्याशा वाटल्या , तर त्यात नवल नाही. या ‘ स्माइलीज ‘ नी आपलं बोलणं अत्यंत कमी वेळाचं , सोपं आणि वेगाचं करून टाकलं. म्हणूनच’LOL’ ( लाफ आऊट लाऊड) , ‘OMG’ ( ओह माय गॉड) किंवा ‘HAGD’ ( हॅव ए गुड डे) हे शॉर्टफॉर्मही आता हद्दपार होऊन तरुणांना ‘ स्माइली ‘ अधिक आपल्याशा आणि जवळच्या वाटू लागल्या आहेत.