अनेक परदेश ब्रॅम्डच्या तोडीस तोड फोन उपलब्ध करुन अल्पावधीत नावारुपाला आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने अखेर आपल्या कॅनव्हास-४ या बहुप्रतीक्षित मोबाईल फोनच्या किंमतीची घोषणा केली आहे. हा मोबाईल १७ हजार ९९९ रुपयांना मिळणार असून कॅनव्हास फोर हाच आता मायक्रोमॅक्स कंपनीच्या अॅड्रॉइन फोन्सचा नवीन चेहरा असणार आहे.
अनेक बाबतीमध्ये कॅनव्हास-४ हा एचडीशी साधर्म्य साधणारा आहे. एचडीमध्ये वापरण्यात आलेल्या एमटी ६५८९ क्वॉड कोअर प्रोसेसरवरच कॅनव्हास फोर चालणार असून हा फोन प्रोसेसर ‘मीडीया टेक’ या कंपनीने बनवलेला आहे. कॅनव्हास फोरचा लुकही इतर मोबाईलच्या तुलनेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलण्यात आला आहे. यामध्ये ७२० पिक्स रेझुलेशनची ५ इंच टच स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनची इंटर्नल मेमरी १६ जीबी असून एक जीबी रॅम असणार आहे. एक्स्टर्नल मेमरी मायक्रो एसडी वाढवता येईल. सर्वात लेटेस्ट असणारी अॅड्रॉइड ४.२ (जेलीबीन) ऑपरेटिंग सिस्टीम या फोनमध्ये वापरण्यात आली असून यामध्ये २ हजार एमएएच पॉवर बॅटरी असणार आहे.
कॅनव्हास फोरचे हार्डवेअर स्पेसीफिकेशन जरी कॅनव्हास एचडीसारखे असले तरी इतर मायक्रोमॅक्स फोन्सपेक्षा या फोनची रचना आणि सॉफ्टवेअर डिझाईन वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्लॅस्टीक आणि अॅल्यूमिनियमचा वापर करुन कॅनव्हास-४ ची बॉडी तयार करण्यात आली आहे. या मोबाईलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईलमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असून फ्रन्ट कॅमेराही पाच मेगापिक्सल आहे.
मायक्रोमॅक्स-४ साठी प्री बुकींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पाच हजार रुपये भरुन मोबाईल लाँचींगच्या आधीच अनेकांनी हा फोन बुक केला आहे. १० तारखे पासून मोबाईलची डिलीव्हरी सुरु होणार असून आतापर्यंत साडे अकरा हजार कॅनव्हास फोर मोबाईल्सचे बुकींग झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. पहिल्यांदाच भारतीय मोबाईल ब्रॅण्डच्या मोबाईल लाँचसाठी अशा प्रकारची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत आहे.
मायक्रोमॅक्स-४ चे काही खास फिचर्स
> ब्लो टू अनलॉक फोन (फूंक मारुन फोन अनलॉक करणे) सारखे विशेष फिचर्सही आहेत.
> फोन वाजत असल्यास फक्त फोन उचलून कानाला लावल्यास बटन न दाबता कॉल रिसिव्ह करता येणार.
> फोन उलटा ठेवल्यास तो सायलेन्ट मोडवर टाकण्याचे अनोखे फिचरही या फोनमध्ये आहे.
> प्रॉक्सी सेन्सर्सच्या मदतीने फोन लावण्याचीही सोय मायक्रोमॅक्स कॅनव्हास फोरमध्ये आहे.
> स्मार्ट पॉझसारखे सॅमसंग मोबाईलमध्ये असणारे फिचरही कॅनव्हास फोरमध्ये देण्यात आले आहेत. या फीचरमध्ये व्हिडीओ पाहताना तुम्ही स्क्रीनवरुन नजर हटवल्यास व्हिडीओ आपोआप पॉज होतो. पुन्हा तुम्ही व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केल्यास तो पुन्हा प्ले होतो.
> व्हिडीओमध्येही अनेक विशेष फिचर्स देण्यात आले आहेत.
“कॅनव्हास फोरच्या लॉन्चिंगने आम्ही नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कॅनव्हास फोर हा फक्शन, स्टाइल आणि वापरण्यास योग्य अशा मोबाईलसाठी आदर्श असा फोन आहे. तसेच या फोनमधील अॅप्लिकेशन आमच्या नवीन ग्राहकांना आकर्षीत करणारे आहेत.”
– राहूल शर्मा (सह संस्थापक मायक्रोमॅक्स)
“मायक्रोमॅक्स या ब्रॅण्डचा भारतातील विस्तार जलदगतीने होत आहे. त्यामुळे आम्ही खूपच उत्साहीत आहोत. २०१३च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतातील एकूण स्मार्टफोन मार्केटपैकी १७.१ टक्के मार्केटवर मायक्रोमॅक्सचे वर्चस्व असून भारतात आम्ही दूस-या क्रमांकावर आहोत. तर सायबर मिडीया रिसर्चच्या अहवालाप्रमाणे आम्ही एप्रिलमध्ये २४.३ टक्के मार्केट काबीज केले आहे.”
– दीपक मन्होत्रा (सीईओ मायक्रोमॅक्स)