ऑनलाइन स्मार्टफोन बाजारात आता विवोचं अस्तित्व तितकं जाणवत नसलं तरी त्यांनी ऑफलाइन मार्केटमध्ये बरच वर्चस्व मिळवलं आहे. U आणि Z सिरिज फोन्सला विशेष यश मिळालेलं दिसत आहे. आज सादर झालेला Vivo V17 सुद्धा नव्या iView डिस्प्ले सह मिळणार असून यामध्ये फ्रंट कॅमेरासाठी छोटा होलपंच दिलेला आहे. यामुळे फोनचा जवळपास पूर्ण भाग डिस्प्लेने व्यापलेला दिसतो!
Vivo V17 मध्ये 6.44 इंची FullHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावेळी फ्रंट कॅमेरासाठी त्यांनी नवं डिझाईन वापरलं आहे. या AMOLED डिस्प्ले फोनमध्ये डिस्प्ले खालीच फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. क्वालकॉमचा Snapdragon 675 प्रोसेसर देण्यात आला असून 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिलेलं आहे. ऑपरेटिंग सिस्टम मात्र जुनी का देण्यात आली आहे हे समजलं नाही. Android 9 Pie आधारित FunTouchOS 9.2 चा या फोनमध्ये समावेश आहे. काही दिवसात विवो त्यांची नवी ओएस सादर करत असून त्यानंतर अपडेट द्वारे Android 10 या फोनमध्ये वापरता येईल. कॅमेरासाठी यामध्ये चार विविध कॅमेरा जोडण्यात आले असून मुख्य कॅमेरा 48M, ultra-wide-angle 8MP (f/2.2), डेप्थ सेन्सर 2MP (f/2.4) आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. Super Night Mode द्वारे रात्रीसुद्धा उत्तम फोटो काढता येतील असं विवोने सांगितलं आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग दिलेलं आहे.
डिस्प्ले : 6.44 ” FHD+ Super AMOLED
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 675
GPU : Adreno 640
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3.0 ROM
कॅमेरा : 48MP Main + 8MP Ultra Wide Angle + 2MP Depth + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 32MP f/2.45
बॅटरी : 4500mah 18W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6.1 customized by realme
इतर : Bluetooth 5.0, Type-C,
सेन्सर्स : In-Display Scanner, Accelerometer, Ambient light sensor, Ambient light sensor, Gyroscope
रंग : Midnight Ocean, Glacier Ice
किंमत : हा फोन १७ डिसेंबर पासून फ्लिपकार्ट, विवो स्टोअर्समध्ये मिळेल. याची किंमत २२९९० अशी असेल.
8GB+128GB ₹२२९९०