मायक्रोसॉफ्टने काल पार पडलेल्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्फेस उत्पादनांची मालिका सादर केली असून यामध्ये Windows 10X ही ऑपरेटिंग सिस्टम, Surface Pro X, Surface Pro 7 हे टॅब्लेट, Surface Laptop 3 हा लॅपटॉप, Surface Neo हा ड्युयल डिस्प्ले असलेला टॅब्लेट, Surface Earbuds आणि Surface Duo हा ड्युयल डिस्प्ले अँड्रॉइड फोन यांचा समावेश आहे!
Windows 10X : विंडोज १० ची एकापेक्षा अधिक डिस्प्ले असलेल्या डिव्हाईसेससाठी ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10X या नावाने ओळखली जाईल. यावर आधारित नवा Surface Neo टॅब्लेटसुद्धा सादर करण्यात आला असून यामध्ये असलेल्या दोन डिस्प्लेचा सहज वापर करता येईल असे पर्याय Windows 10X मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ओएसवर आधारित उत्पादने लवकरच बाजारात दिसू लागतील.
Surface Neo : याला मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं पहिलं ड्युयल डिस्प्ले टॅब्लेटसदृश डिव्हाईस म्हणता येईल. यामध्ये दोन ९ इंची डिस्प्लेंचा वापर केलेला आहे. हे गॅलक्सी फोल्ड प्रमाणे डिस्प्लेची घडी घातली जात नाही तर त्याऐवजी दोन स्वतंत्र डिस्प्लेच एकत्र जोडण्यात आले आहेत! हे उत्पादन डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून २०२० मध्ये उपलब्ध करून दिलं जाईल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे. यासाठी स्वतंत्र कीबोर्ड तयार केला असून तो एका डिस्प्लवर ठेवून वापरता येतो. असे केल्यास त्या एका डिस्प्लेचा उर्वरित भाग टचबार प्रमाणे वापरता येईल आणि मायक्रोसॉफ्टने त्याला वंडरबार नाव दिलं आहे! व्हिडिओ : https://youtu.be/fssZICsV4Rg
Surface Pro X : हा मायक्रोसॉफ्टचा नवा 2 in 1 टॅब्लेट असून यामध्ये १३ इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅब्लेट ARM आधारित असून या टॅब्लेटमध्ये Surface SQ1 chip ही त्यांनी Qualcomm सोबत भागीदारीत बनवलेली चिप पहायला मिळेल. सोबत USB-C, fast charging आणि integrated LTE support दिलेला आहे. 8GB/16GB रॅम, Microsoft SQ1 प्रोसेसर, Adreno 685 GPU, 2880 x 1920 (267 PPI) 13″ डिस्प्ले, सर्फेस पेन, डायल सपोर्ट, १३ तासांची बॅटरी लाईफ, 5MP फ्रंट, 10MP बॅक कॅमेरा, 128/256/512GB SSD स्टोरेज मिळेल. याची किंमत $999 असेल. व्हिडिओ : https://youtu.be/v5SFBpMiaiQ
Surface Earbuds : आता मायक्रोसॉफ्टने सुद्धा त्यांचे वायरलेस इयरबड्स आणले असून यांची यामध्ये टच जेश्चर्सद्वारे नियंत्रण करता येतं! अगदी पॉवरपॉइंट स्लाईड्ससुद्धा यांना स्पर्श करून पुढे ढकलता येतात! यामध्ये directional dual-array microphone चा समावेश आहे. यांची किंमत $249 असणार आहे. व्हिडिओ : https://youtu.be/EwxyD_dkGVA
Surface Pro 7 : मायक्रोसॉफ्टच्या या प्रसिद्ध टॅब्लेट मालिकेतलं नवं मॉडेल काल सादर झालं असून यामध्ये इंटेलचे 10th Gen प्रोसेसर असतील. आता यामध्ये USB Type C पोर्ट कनेक्टर देण्यात आला आहे. 4GB/8GB/16GB रॅम, i3/i5/i7 प्रोसेसर, 2736 x 1824 (267 PPI) 12.3″ डिस्प्ले, सर्फेस पेन, डायल सपोर्ट, १०.०५ तासांची बॅटरी लाईफ, 5MP फ्रंट, 8MP बॅक कॅमेरा, 128/256/512GB/1TB SSD स्टोरेज. याची किंमत $749 आहे व्हिडिओ : https://youtu.be/V4Hwi3o2X0E
Surface Laptop 3 : सर्फेस लॅपटॉपची नवी तिसरी आवृत्ती आता १३ व १५ इंची मॉडेल्समध्ये उपलब्ध होत आहे. याचा ट्रॅकपॅड २० टक्क्यांनी मोठा असेल. AMD Ryzen Surface Editionसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असून यामधील ग्राफिक्स कामगिरी सर्वोत्तम असेल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे. याच्या १३” मॉडेलची किंमत $999 असून १५ इंची मॉडेलची किंमत $1199 आहे. व्हिडिओ : https://youtu.be/o3IQ1JrXnV8