नोकियाच्या पहिल्या टॅब्लेटबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या टॅब्लेटची स्क्रीन 10.1 इंचाची आहे. हे या टॅब्लेटचे प्रमुख आकर्षण आहे.
नोकियाने ल्युमिया 2520 हा टॅब्लेट लॉंच केला. हा एक उत्कृष्ट टॅब्लेट आहे. त्यात वेगळा किबोर्ड जोडण्याचीही सोय आहे. टॅब्लेटचे लुक्स स्टायलिश आहेत. स्क्रीन रिझॉल्यूशन 1080 पिक्सेल एवढे आहे. स्क्रीन फुल एचडी डिस्प्ले देते. खास बाब म्हणजे, कंपनीने 4 रंगांमध्ये टॅब्लेट सादर केला आहे. नोकियाचा टॅब्लेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 2 प्रोटेक्शनसोबत येतो. कनेक्टीव्हीटीबाबत बोलायचे झाल्यास या टॅब्लेटमध्ये 4जी तंत्रज्ञान आहे. कोणत्याही टॅब्लेटमध्ये 4जी तंत्रज्ञान अद्याप पुरविण्यात आलेले नाही. 4जी तंत्रज्ञानामुळे हाय स्पीड ब्राऊझिंगचा वेगळाच आनंद मिळेल.
ल्युमिया 2520 टॅब्लेटमध्ये स्नॅपड्रॅगन 800 क्वाड कोर 2.2 GHz प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच 2 जीबी रॅम आहे. त्यामुळे निश्चितच टॅब्लेट अतिशय फास्ट आहे. टॅब्लेटमध्ये विंडोज 8.1 RT ही लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टिम वापरण्यात आली आहे. नोकिया 2520 मध्ये बॅटरी चार्जिंग खूप वेगात होते. केवळ एका तासात बॅटरी 80 टक्के चार्ज होते. या टॅब्लेटमध्ये 6.7 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच समोरुन 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. नोकियाचे खास स्टोरीटेलर आणि व्हिडिओ डायरेक्टर ऍप्सदेखील या टॅब्लेटमध्ये आहेत.
नोकियाने अबूधाबी येथे टॅब्लेटचे लॉंचिंग केले. यावर्षी तरी हा टॅब्लेट ग्राहकांच्या हातात पडण्याची शक्यता नाही. या तिमाहीत अमेरिका, इंग्लंड आणि फिनलंड येथे टॅब्लेट पाठविण्यात येईल. इतर बाजारपेठेत पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टॅब्लेट उपलब्ध होईल. भारतातील लॉंचिंगबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. तरीही पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात हा टॅब्लेट लॉंच होण्याची अपेक्षा आहे. टॅब्लेटची किंमत 499 डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 31 हजार रुपये आहे. तसेच यासोबत मिळणा-या स्वतंत्र किबोर्डची किंमत 9 हजार रुपये आहे.