उत्सवांच्या काळात शुभेच्छांना कॅश करणा-यासाठी मोबाइल सर्व्हिस कंपन्यांची धडपड सुरू असयाची. यासाठीच सणाच्या दिवशी एसएमएस पाठवण्यासाठी मोबाइल कंपन्या प्रति एसएमएस एक रुपया ग्राहकाला मोजायला लावयचे आणि फायदा कमवायचे. मात्र यंदा ‘व्हॉट अॅप’मुळे ऐन सणासुदीच्या मोसमात मोबाइल कंपन्यांचं दिवाळं काढलंय.
मोबाइल इंटरनेटचा वापर जसजसा वाढत गेला तसतशी अॅपची संख्या वाढत गेली. मोबाइल युझर्सला महत्वाचे वाटणारे असे अॅप मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. पण या सगळ्यात बाजी मारली ती व्हॉट्स अॅपने. रोजचा संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅपची सेवा युझर्सला अधिक आवडली आणि कमी काळात व्हॉट्स अॅप प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये दिसू लागले. एसएमएसमध्ये शब्दांची मर्यादा असते, तशी शब्दमर्यादा मेसेजिंग अॅपमध्ये नाही. तसेच व्हॉट्स अॅपवर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण अधिक सोप आणि सहज असल्याने शुभेच्छा देण्यासाठी यंदा प्रथम पसंती मिळाली आहे ती व्हॉट्स अॅपला. मात्र यामुळे सणाच्या आनंदाला कॅश करू पाहणा-या मोबाइल सर्व्हिस कंपन्यांना मोठाच फटका बसला. एसएमएसच्या वाटेला आता फारसे कुणी जात नाही, सारे कार्यक्रम ठरतात आणि शुभेच्छाही शेअर होतात व्हॉट्स अॅपवर. त्यामुळे एसएमएसचं मार्केटच चांगलंच डाऊन झालं आहे आणि तेही जवळपास ८० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे.
मेसेजिंग अॅपमध्ये होणारी वाढ एसएमएसला लवकरच मोबाइलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT