गूगल क्रोमच्या नव्या अपडेटमध्ये Send To Device ही सोय जोडण्यात आली असून हे अपडेट आता विंडोज, मॅक, iOS आणि अँड्रॉईडवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. क्रोममध्ये या अपडेटद्वारे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामधील प्रमुख सोय सेंड टू डिव्हाईस म्हणावी लागेल. तुम्ही डेस्कटॉप/लॅपटॉपवर क्रोमद्वारे एखादी वेबसाइट पाहत असाल आणि आता तुम्हाला ती वेबसाइट फोनमध्ये उघडायची आहे तर तो वेबसाइट URL फोनमध्ये टाइप करणे किंवा मेल/मेसेज करून मग त्याद्वारे उघडणे असं काही करावं लागणार नाही. त्या वेबसाइटवर असताना राइट क्लिक करा आलेल्या मेनूमधून Send to phone (किंवा जे काही नाव असेल ते) निवडा की तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आलेली दिसेल! आणि त्यावर क्लिक केलं की ते वेबसाइट लगेच फोनमध्ये उघडलेली दिसेल!
Chrome 77 अपडेट मध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. बरेच दिवस ही सोय Chrome Flag च्या रूपात उपलब्ध होती आता सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लिंक्स वेगवेगळ्या डिव्हाईस वरून एकमेकांना पाठवणं सोपं होईल आणि यामुळे बराच वेळ वाचेल!
क्रोम अपडेट करण्यासाठी कोपऱ्यात तीन डॉट असलेल्या चिन्हवर क्लिक करून Help > About मध्ये जा क्रोम अपडेट व्हायला सुरूवात होईल.
फोनसाठी अॅप स्टोअर/प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करू शकता.
- प्रथम तुमच्या फोन व पीसी/लॅपटॉपवर क्रोम इंस्टॉल केलेलं आहे का हे पहा
- त्यानंतर दोन्हीकडे तुम्ही तुमच्या गूगल अकाऊंटद्वारे लॉगिन केलेलं आहे का हे पहा
- आता तुम्ही जर डेस्कटॉपवर असाल तर तुम्हाला वेबसाइटच्या लिंकवर क्लिक केल्यास उजवीकडे Send This Page चं चिन्ह दिसेल (लॅपटॉप आणि मोबाइल यांचं मिश्रण असलेला आयकॉन)
- त्यावर क्लिक करून आलेल्या यादीतून तुमचा फोन निवडा
- आता तुम्हाला तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलेली दिसेल
- त्यावर क्लिक केल्यास टी वेबसाइट तुमच्या फोनवरील क्रोमवर उघडलेली दिसेल!
- हीच सोय फोनवर उघडलेली वेबसाइट डेस्कटॉप/लॅपटॉपवर पाठवण्यास सुद्धा वापरता येते!
Search Terms : Send Links from PC to phone Phone to PC Windows Mac Android iOS Google Chrome Devices
सर, सविस्तर रित्या सांगितले आहे.. धन्यवाद