गूगलने आजवर त्यांच्या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध आवृत्त्यांची नावे डेझर्ट्सवरून ठेवली होती. उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0) आणि पाय(9.0) मात्र आता येणाऱ्या नव्या आवृत्तीसाठी ही गोष्ट बदलणार आहे. काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या Android Q चं अधिकृत नाव आता Android 10 असं असणार आहे. याबद्दल आज गूगलतर्फे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
आज अँड्रॉइड फोन्ससोबत टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट, कार्स, स्मार्टघड्याळे अशा अनेक उपकरणामध्ये जोडलेली असते. सध्या तब्बल २५० कोटी उपकरणामध्ये अँड्रॉइड अॅक्टिव आहे! नाव देण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत गूगल अशी माहिती दिली आहे की जगात सर्वच ठिकाणी या नावांमागे असणारा उद्देश पोहचत नव्हता ज्यामुळे अनेकांना व्हर्जन्सविषयी संभ्रम निर्माण व्हायचा. कोणतं नाव असलेली ऑपरेटिंग सिस्टिम नवी आहे हे कळण्यास अवघड जात होतं. म्हणून आता अंक वापरुनच ऑपरेटिंग सिस्टिम आवृत्तीला नाव दिलं जाईल. ज्याची सुरुवात Android Q पासून होत असून आता याचं अधिकृत नाव Android 10 असं असणार आहे.
Next evolution of Android : https://youtu.be/l2UDgpLz20M
अँड्रॉइडच्या लोगो व ब्रॅंडच्या ओळखीमध्येसुद्धा २०१४ पासून बदल करण्यात आला नव्हता. मात्र आता अँड्रॉइडसाठी सुद्धा नवा लोगो तयार करण्यात आला आहे. अँड्रॉइड रोबॉटवरून प्रेरणा घेत हा नवा लोगो बनवल्याचं सांगण्यात येत आहे. अँड्रॉइड लोगोचा रंगसुद्धा हिरव्यापासून बदलून काळा करण्यात आला आहे. ज्यामुळे लोगो पाहणं आणि समजणं सोपं होईल!
सध्या गूगलचा हा अँड्रॉइडबद्दलचा निर्णय अनेकांना आवडला नाही असंच दिसतय सध्या ट्विटरवर #Android10 ट्रेंडसुद्धा पहायला मिळतोय. तिथे तुम्ही यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचू शकता.