फ्लिपकार्टने बुधवारी फ्लिपकार्ट समर्थ नावाचा उपक्रम सादर केला असून याद्वारे भारतातील कारागीर, विणकर, हस्तकलेचा वापर करून उत्पादने तयार करणाऱ्याना इ कॉमर्सचा वापर करत आपली उत्पादने विकण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. ऑनलाइन विक्रीच्या या पर्यायाद्वारे देशातील विविध भागात असणाऱ्या दुर्लक्षित समुदायाला भारतात सर्वत्र उत्पादन विकून फायदे मिळावे असा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : Flipkart Samarth
फ्लिपकार्ट समर्थ द्वारे कारागीरांना ऑनलाइन वस्तु विकण्यासाठी करायला लागणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये मदत केली जाईल. त्याबद्दलची माहिती दिली जाईल. यामध्ये onboarding, cataloguing, account management, business insights, dedicated seller support, reduced commission where eligible व warehousing support अशा सर्व प्रक्रियेचा समावेश असेल.
फ्लिपकार्ट समर्थ द्वारे खालील घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल
a. NGOs (स्वयंसेवी संस्था)
b. Government Bodies (सरकारी संस्था)
c. Rural Women (ग्रामीण स्त्रिया)
e. Specially Abled
f. Artisans (कारागीर)
g. Weavers (विणकर)
h. Social Enterprises (सामाजिक उपक्रम)
यादृष्टीने ते स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्थासोबत काम करतील जेणेकरून अधिकाधिक ग्रामीण उद्योजक, कारागीर, विणकर, स्त्रिया यांच्यापर्यंत पोहोचता येईल. याबद्दलची माहिती फ्लिपकार्ट प्रमुख कल्याण कृष्णमूर्ती यांनी दिली. यावेळी सरकारतर्फे मंत्री अनुराग सिंग ठाकूर, संजय काका पाटील, अण्णासाहेब जोल्ले हे उपस्थित होते.