सोशल मीडियाने आज लोक एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतात, देवाण घेवाण करतात याचं नवं माध्यम बनून पर्याय उभा केला आहे. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, ओळखीचे-अनोळखी अशा सर्व प्रकारच्या लोकांसोबत आता सहज संपर्कात राहता येतं. इंटरनेट उपलब्ध असणारा जवळपास प्रत्येकजण आज कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया वेबसाइट किंवा अॅपचा वापर करत असतोच. तर या सोशल मीडियाच्या जागतिक संपर्क माध्यमावर असलेल्या प्रभावाला दाद देण्यासाठी/ ओळख देण्यासाठी मॅशेबल (Mashable) या प्रसिद्ध टेक वेबसाइटने Social Media Day (#SMDay) हा दिवस सुरू केला आहे.
सर्वात पहिली सोशल मीडिया किंवा सोशल नेटवर्किंग साईट असण्याच श्रेय शक्यतो SixDegrees ला दिलं जातं. याची सुरुवात १९९७ मध्ये झाली होती. त्यानंतर आजपर्यंत AOL मेसेंजर, याहू मेसेंजर, एमएसएन मेसेंजर, लाईव्ह जर्नल, विंडोज मेसेंजर, फ्रेंडस्टर, लिंक्डइन, मायस्पेस, स्काईप, फेसबुक, फ्लिकर, ऑर्कुट, रेडिट, यूट्यूब, ट्विटर, टंबलर, ब्लॉगर, फोरस्क्वेअर, पिनट्रेस्ट, इंस्टाग्राम, कोरा, स्नॅपचॅट, गूगल प्लस, ट्विच, टिंडर, वाईन, पेरीस्कोप, डिस्कॉर्ड असा प्रवास सोशल मीडियाने पार केला आहे! त्या त्या काळात विशिष्ट साइट्स लोकप्रिय होत्या ज्या आज नव्या पर्यायांमुळे अस्तंगत झालेल्या दिसत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम, विचॅट, टिक टॉक सारखे अॅप्स रूढार्थाने जारी सोशल मीडिया नसले तरी आता त्यांच्या वापर त्या प्रमाणेच होताना दिसत आहे.
- सोशल मीडिया म्हणजे Web 2.0 आधारित इंटरनेट अॅप्लिकेशन्स
- यूजर्सनी तयार केलेल्या पोस्ट, कमेंट्स, फोटो, व्हिडिओ, ऑनलाइन पद्धतीने तयार झालेला डेटा हे सर्व मिळून सोशल मीडिया तयार होते.
- यूजर्स त्यांच्या गरजेनुसार त्या त्या सोशल मीडिया वेबसाइट किंवा अॅपवर स्वतःची प्रोफाइल तयार करतात.
- सोशल मीडियावर सोशल नेटवर्कद्वारे तयार झालेल्या प्रोफाइल्स द्वारे एकमेकांसोबत किंवा ग्रुप्स तयार करून ऑनलाइन संपर्कात राहता येतं
सोशल मीडिया कसा साजरा केला जातो ?
आजच्या दिवशी सोशल मीडिया वेबसाइट्स किंवा अॅप्सवर #SocialMediaDay #SMDay या हॅशटॅग वापरुन पोस्ट्स केल्या जातात. सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात किंवा समाजामध्ये काय बदल घडवून आणले याबद्दल चर्चा केली जाते. याची सुरुवात ३० जून २०१० पासून मॅशेबलद्वारे करण्यात आली असून २०१८ पर्यंत माशेबल स्वतः कार्यक्रम आयोजित करायच आता मात्र त्यांनी ही लोकांकडे सोपवत असल्याच जाहीर केलं आहे.
संदर्भ : Timeline of social media
Search Terms : Social Media Day being observed to recognize social media websites such as SixDegrees, AOL Messenger, Yahoo Messenger, MSN Messenger, LiveJournal, Windows Messenger, Friedster, LinkedIn, MySpace, Skype, Facebook, Flickr, Orkut, Reddit, YouTube, Twitter, Tumblr, Foursquare, Pinterest, Instagram, Quora, Snapchat, Google Plus, Twitch, Tinder, Vine, Discord