सॅमसंगने गॅलेक्सी स्टारच्या पूढच्या व्हर्जनमधील हॅण्डसेटमध्ये तीन सिम असणार आहेत. कंपनीने नुकताच ट्रिपल सिम स्लॉट असणारा गॅलेक्सी स्टार ट्रायो लॉन्च केला आहे. मात्र कंपनीने याची किंमत सांगितली नसली तरी तो सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल.
तीन सिम असणाऱ्या गॅलेक्सी स्टार ट्रायोमध्ये अँड्रॉईड 4.1 जेलीबीन असेल. यामध्ये 3.1 इंच क्यूव्हीजीए 240X320 पिक्सेल असणारा टीएफटी डिसप्ले असेल. याशिवाय याचा रॅम 512 एमबी आणि सिंगल कोर 1 गिगाहर्त्झ स्नॅपड्रॅगन एसवन प्रोसेसर आहे.
या स्मार्टफोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, मात्र यात फ्रण्ट कॅमेरा नाही. याशिवाय याची इंटरनल मेमरी चार जीबी असून ती 32 जीबीपर्यंत एक्स्पांड करता येऊ शकते.
हा फोन वायफायने कनेक्ट करता येतो आणि यात 4.0 ब्लुटुथ पण उपलब्ध आहे. फोनमध्ये 1300 एमएचची बॅटरी असून याचं वजन 105 ग्रॅम आहे. सध्या हा फोन काळ्या रंगातच उपलब्ध आहे.
याआधी एलजी कंपनीने ट्रिपल सिम असणारा मोबाईल फोन बाजारात आणला आहे. तीन सिम असणाऱ्या एलजी आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स सारखेच आहेत.
ADVERTISEMENT