मायक्रोसॉफ्ट ऑफिस अनेक गोष्टींसाठी उत्तम प्रोडक्टिव्हिटी टूल आहे परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या किंमतींमुळे ते अनेकांना परवडण्यासारखे नाही शिवाय अनेकांना तितकी गरजही भासत नाही. त्याचबरोबर अनेकदा मायक्रोसॉफ्ट ऑफिससारख्या सॉफ्टवेअरमुळे परफॉर्मन्समध्ये होणारा बदल आलाच, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिसला उपलब्ध असणारे काही मोफत पर्याय ज्याद्वारे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमधील सुविधा आपण सहज वापरू शकता.
मायक्रोसॉफ्ट ऑफिसला ५ मोफत पर्याय!
WPS Office – WPS Office हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी एक उत्तम पर्याय आहे. किंगसॉफ्ट तर्फे विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड या प्लॅटफॉर्म्सवर WPS Office मोफत उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर रिसोर्स हेवी नसून यामुळे ओव्हरऑल सिस्टिम कामगिरीसुद्धा चांगली राहण्यास मदत होते. मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखाच याचा UI असून वापरण्यास सोपा आहे. खालील लिंकवरून आपण ते डाउनलोड करू शकता. मोफत ऑफीस सॉफ्टवेअर्समध्ये WPS सर्वात लोकप्रिय आहे!
डाउनलोड लिंक – WPS Office
Google Docs, Sheets, Slides – गूगलतर्फे हे पर्याय आपणास उपलब्ध आहेत. हे सर्व क्लाऊड आधारीत मोफत टूल असून यासाठी आपणास फक्त गूगल अकाउंटची गरज भासते. कोणत्याही ब्राउझरद्वारे आपण गूगलच्या ड्राइव्ह सेवेद्वारे सहजरित्या वापरू शकता. याबरोबरच गूगल क्रोमवरील एक्सटेंन्शन द्वारे ते ऑफलाईन सुद्धा वापरता येईल. गूगलतर्फे उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सद्वारे ऑटो सिंक सुद्धा उपलब्ध असल्यामुळे आपण मोबाईलवरूनही ते वापरू शकता.
लिंक – Google Docs, Google Sheets, Google Slides
Polaris Office – पोलॅरिस ऑफिससुद्धा मोफत उपलब्ध असून यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सोबतच पीडीफ व्हयुवरचा समावेश आहे. पीडीफ डॉक्युमेंट एडिट तसेच कन्व्हर्ट करण्याची सुविधा यामध्ये आहे. सोबतच क्लाऊड कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स उपलब्ध आहेत. हे सुद्धा लाइट वेट टूल असून यामुळे परफॉर्मन्सवर तितकासा परिणाम होणार नाही. विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड सोबतच मॅकवर सुद्धा हे टूल वापरता येईल.
डाउनलोड लिंक – Polaris Office
Libre Office : हे सॉफ्टवेअर बऱ्याच लिनक्स आधारित डिस्ट्रोवर आधीच दिलेलं पाहायला मिळतं. यामध्येही वर्ड डॉक्युमेंट्स, स्प्रेडशिट्स व प्रेझेंटेशन स्लाईड्स तयार करता येतात!
डाउनलोड लिंक : LibreOffice
Apache Open Office – ओपन ऑफिस हे एक ओपन सोर्स प्रोडक्टिव्हिटी टूल असून सर्वच प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. हे पूर्णतः ऑफलाईन उपलब्ध असून मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणारे बहुतेक फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. यासाठी मागील वर्षी शेवटचा उपडेट उपलब्ध झाला होता.
डाउनलोड लिंक – Apache Open Office
वरील पर्यायांव्यतिरिक्त आणखी अनेक टूल्स उपलब्ध आहेत जसे की SoftMaker FreeOffice, OnlyOffice, Zoho Office इत्यादी.
Search Terms : Top 5 free alternatives to Microsoft office