DJI या प्रसिद्ध ड्रोन्स बनवणार्या प्रसिद्ध कंपनीने आज त्यांचा पहिला अॅक्शन कॅमेरा सादर केला असून याची आता गोप्रोसोबत स्पर्धा पाहायला मिळेल. अॅक्शन कॅमेरामध्ये आजवर गोप्रोला चांगला पर्याय नव्हता मात्र आता डीजेआयने गोप्रोसमोर चांगलं आव्हान निर्माण केलं आहे. GoPro Hero 7 मधील जवळपास सर्व सोयीनसोबत आणखी काही खास फीचर्स जोडून DJI Osmo Action सादर करण्यात आला आहे. या कॅमेराची किंमत $349 (₹२५०००) आहे.
डीजेआय ड्रोन्समध्ये तर गोप्रो अॅक्शन कॅमेराच्या बाजारात अधिराज्य गाजवून आहेत. काही वर्षांपूर्वी या कंपन्या एकमेकांसोबत काम करायच्या मात्र आता थेट स्पर्धक असून गोप्रोने ड्रोन्स मार्केटमध्ये कर्माच्या रूपात एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला तर आता डीजेआय अॅक्शन कॅमेरा विश्वात प्रयत्न करून पाहत आहे…
DJI Osmo Action मध्ये ११ मीटर्स पर्यंत वॉटरप्रुफिंग, 12MP कॅमेरा, 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग, (240fps at 1080p), 8x slow mo, stabilization देण्यात आलं आहे! सध्या अॅक्शन कॅमेरामध्ये GoPro Hero 7 चं स्टॅबिलायझेशन सर्वोत्तम मानलं जातं. सुरुवातीच्या रिव्यूनुसार डीजेआय ऑस्मो अॅक्शनमध्ये कमी प्रकाशात चांगले फोटो वा व्हिडिओ येत नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात भर म्हणजे डीजेआयचा कॅमेरा फोटो व व्हिडिओ दोन्हीमध्ये गोप्रोपेक्षा अधिक क्रॉप करतो (यामुळे डीजेआय कॅमेरा कमी दृश्य टिपतो)
डीजेआयच्या कॅमेरामध्ये एक नवी सोय देण्यात आली आहे ती म्हणजे फ्रंट सेल्फी स्क्रीन. यामुळे कॅमेरा समोर धरून स्क्रिनवर प्रीव्यू पाहून सेल्फी काढता येते. गोप्रोच्या फ्रंट स्क्रिनवर फक्त कॅमेरा सेटिंग पाहता येतात. डीजेआय अॅक्शन कॅमेरामध्ये फिरवून लावता येणारे फिल्टर उपलब्ध आहेत त्यामुळे लेन्सला सुरक्षितता मिळेल व फोटोसुद्धा चांगला येण्यास मदत होऊ शकते. यासाठी नवी माऊंट सिस्टिम सुद्धा आहे!
DJI Osmo Action Specs :
Sensor: 1/2.3″ CMOS
Effective pixels: 12M
Lens : FOV: 145° f/2.8
ISO Range Photo: 100-3200 Video: 100-3200
Electronic Shutter Speed : 120-1/8000s
Max Image Size : 4000×3000 pixels
Battery : 1300 mAh
Front Screen : 1.4 inches, 300 ppi, 750 ±50 cd/m²
Back Screen : 2.25 inches, 640×360, 325 ppi, 750 ±50 cd/m²
Max Video Bitrate : 100 Mbps
Supported File Formats FAT32 (≤32 GB); exFAT (≥64 GB)
Photo Formats JPEG/JPEG+DNG
Video Formats MOV, MP4 (H.264)
Supported SD Cards microSD; Max. 256 GB
Audio Output 48 KHz; AAC
Search Terms : DJI launches Osmo Action camera with 4K 60fps, front selfie screen, waterproofing