काल सुरू झालेल्या गूगलच्या I/O 2019 कार्यक्रमात गूगलने अनेक नव्या उत्पादनांची घोषणा केली. त्यामध्ये प्रमुख चर्चा झालेली गोष्ट म्हणजे नेहमीच्या पिक्सल स्मार्टफोन्सची कमी किंमत असलेली आवृत्ती Pixel 3a. हे स्मार्टफोन सादर करताना गूगलने त्यांच्या फ्लॅगशिप फोन्समधील कॅमेरा व सॉफ्टवेअर निम्म्या किंमतीच्या फोन्समध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आता हे Pixel 3a व Pixel 3a XL बाजारात उपलब्ध झाले आहेत.
या दोन्ही फोन्सच्या डिझाईन, सॉफ्टवेअर, कॅमेरा या गोष्टी पिक्सल 3 प्रमाणेच असून दोन्हीमध्ये जुना अस्पेक्ट रेशो असलेला डिस्प्ले आहे. प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 670 व 4GB रॅम देण्यात आलेली आहे! या फोनची भारतीय किंमत ३९९९९ असून ही किंमत लक्षात घेता भारतीय यूजर्सना या फोन्सपेक्षा इतर पर्यायच योग्य ठरतील असं चित्र आहे.
कॅमेराच्या बाबतीत मात्र हा फोन उत्कृष्ट आहे यात शंका नाही. यामध्ये Night Sight, Portrait Mode अशा सोयी देण्यात आलेल्या आहेत सोबत गूगल फोटोजमध्ये अमर्याद स्टोरेजसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे!
Google Pixel 3a Specifications:
डिस्प्ले : 5.6-inch FHD+ OLED 441 ppi (Pixel 3a XL 6.0″)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 670
GPU: Adreno 615
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB
बॅटरी : 3000mAh सोबत 18W Fast Charger (Pixel 3a XL: 3700 mAh)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9.0 Pie
कॅमेरा : 12.2 MP dual-pixel ƒ/1.8 OIS+EIS
फ्रंट कॅमेरा : 8 MP f/2.0
रंग : Clearly White, Just Black, Purple-ish
सेन्सर : Active Edge, Proximity/Ambient light sensor, Accelerometer/Gyrometer, Magnetometer, Pixel Imprint, Barometer, Android Sensor Hub, Haptics
इतर : Wi-Fi 2.4 GHz + 5 GHz, Bluetooth® 5.0, NFC, USB-C USB 2.0, 3.5 mm audio jack, ARCore
किंमत :
Pixel 3a ₹39,999
Pixel 3a XL ₹44,999
हा फोन १५ मे पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.