सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा ‘गॅलेक्सी एस-5’ (Galaxy S-5)हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. 51 हजार 500 रुपये एवढ्या किंमतीला हा फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अँड्रॉईडच्या 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर हा स्मार्टफोन आधारित आहे. फेब्रुवारी महिन्यात स्पेनमधील बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा स्मार्टफोन प्रदर्शित करण्यात आला होता. त्याची आगाऊ नोंदणी 29 मार्च पासून सुरु करण्यात आली. या नोंदणीला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. S-4 या आधईच्या स्मार्टफोनच्या तुलनेत ही प्रतिसाद तीन पट अधिक असल्याचं सॅमसंग इंडियाचे विनित तनेजा यांनी एक निवेदनात म्हटलं आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आताप्रर्यंत स्मार्टफोन आणि टॅबलेटसह 3.5 कोटी गॅलेक्सी उपकरणे विकली आहेत. सॅमसंग गॅलेक्सी S5 मध्ये 16 GB इंटर्नल स्टोअरेज सुविधी आहे. तसंच 16 MP रिअर कॅमेरा आणि 2.1 MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 2800 mAh बॅटरी ही फिचर्स आहेत.
अॅपलच्या आयफोन 5-s प्रमाणेच गॅलेक्सी S-5 मध्ये फिंगर स्कॅनर सूविधा आहे त्यामुळे बायोमेट्रिक स्क्रीन लॉकिंग फिचर उपलब्ध आहे. ज्यामुळं तुम्हाला सुरक्षित मोबाईल पेमेंट करता येणं शक्य आहे. तसंच पर्सनल फिटनेस ट्रॅकरचे फिचर यात आहे.
To Know More about Galaxy S5 go to Samsung Galaxy S5 news
ADVERTISEMENT