फेसबुकवर आता खास पत्रकार आणि बातमीदारांसाठी सेवा सुरू झाली आहे. फेसबूकनं स्टोरीफूलच्या सहकार्यातून एफबी न्यूजवायर ही सेवा पत्रकार, बातमीदारांसाठी सुरु केली आहे. आता पत्रकारांना आणि बातमीदारांना नव्या बातम्यांसाठी हा नवा स्त्रोत तर उपलब्ध होणार आहे. या नेटवर्कवरील बातम्या त्यांना आपल्या वेबसाईट आणि ब्लॉगवर थेट टाकता येईल.
फेसबुकनुसार जगभरातील काही कोटी यूझर्स बातम्यांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांच्या निर्मितीमागील घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी फेसबूकचा उपयोग करतात. आता या सेवेमुळं न्यूज स्टोरींचा शोध घेणं सहज सोपं होणार आहे. स्टोरीफूलमुळे सामाजिक आशय असलेल्या स्टोरीचा शोध घेणं आणि खातरजमा करणं सुलभ होईल. एफबी न्यूजवायर प्रामुख्यानं वृत्तपत्रात देण्यालायक असलेल्या आशयाचे एकत्रिकरणाची जबाबदारी पार पाडेल. त्यामुळं ती न्यूज वेबसाईट आणि इतर माध्यांमाद्वारे जगभरातील लोकांपर्यंत पोहचेल.
ही माहिती पोस्ट, स्टेटस ,अपडेटस, पिक्चर्सच्या माध्यामातून लोक फेसबुकवर शेअर करतील. न्यूज सर्व्हिसवरील स्टोरी या ओरिजिनल इमेजसह तसंच संबंधित घटनेच्या व्हिडिओसह उपलब्ध असतील. तसंच एसएनएस सदस्यांद्वारे त्याचे अपडेटही पोस्ट करण्यात येतील. एफबी न्युजवायरवर खेळ, निवडणुका, आंदोलनं यासारख्या महत्वाच्या घटनांना स्थान देण्यात येईल.
तसेच त्याचं कटेंन्ट सातत्यानं रिअल टाईम तत्वावर अपडेट करण्यात येईल. फेसबुकच्या म्हणण्यानुसार पत्रकार आणि माध्यम संस्था या त्यांच्या संकेतस्थळाच्या अविभाज्य भाग आहेत आणि संदर्भांच्या देवाणघेवाणीत एसएनएस ते न्यूज वेबसाईटमध्ये वाढ झाली आहे. फेसबुकने 2013 मध्ये बातम्यांना प्राधान्यक्रम आणि महत्व देण्याचा निर्णय घेतला, कारण लोकांना बातम्या तसेच मित्रमंडळींचे अपडेट एकाच छताखाली मिळण्यात स्वारस्य होते. एफबी न्यूजवायर लाईव्ह आहे आणि आता तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
ADVERTISEMENT