कंपनी कोणतीही असो त्यांना देशांच्या सीमा ओालांडल्यानंतर व्यवसायवृद्धीसाठी तेथील स्थानिक रितीभाती, भाषा आपल्याशा कराव्याच लागतात; त्याशिवाय व्यवसायाची प्रगती होऊ शकत नाही, असा बाजारपेठेचा नियमच आहे. जगभरातील नेटयूझर्सच्या मनावर ठरलेल्या ‘ट्विटर’नेही असाच सकारात्मक बदल करणारे पाऊल उचलले आहे. ‘ट्विटर’वर प्रादेशिक भाषांमध्ये जाहिराती झळकणार आहे.
‘ट्विटर’ने या अभिनव प्रयोगाला नुकतीच सुरुवात केलेली आहे. प्रादेशिक भाषेच्या ग्राहकांचा विचार करूनच ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. यानुसार ‘ट्विटर’वर आता जाहिराती आणि आपल्या अकाउंटरची माहिती जगभरातील तब्बल २० प्रादेशिक भाषांमध्ये झळकणार आहे. याचा ग्राहकांपर्यंत काही विशिष्ट स्वरुपाच्या जाहिराती विश्लेषणात्मक पद्धतीने मांडण्यात येणार आहे. त्याची रचना प्रादेशिक भाषेमध्ये असल्यामुळे ती संबंधितांसाठी उपयुक्त ठरू शकेल, असा ‘ट्विटर’चा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे जगभरात एका विशिष्ट प्रादेशिक भाषेच्या आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्याचा हा ‘ट्विटर’चा अभिनव प्रयत्न आहे. तसेच जगभरात असे अनेक लोक आहेत की जे एकापेक्षा अधिक प्रादेशिक भाषा जाणतात, त्या भाषा संवादासाठी वापरतात.
अशा नेटयूझर्ससाठी ‘ट्विटर’चा हा बदल अधिकच भावणारा ठरेल, असा विश्वास ‘ट्विटर’च्या प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केलेला आहे. येत्या काही दिवसात फुटबॉल वर्ल्ड कपची धूम सुरू होणार आहे. या काळात एखाद्या इटालियन टीमच्या चाहत्याला ग्राहकाला आपल्या प्रादेशिक भाषेतून जाहिरात सादर करायची असेल तर ती त्यासाठी ‘ट्विटर’च्या माध्यमातून चांगली संधी राहील, असे ‘ट्विटर’ प्रशासनाला वाटते. दोन टप्प्यात टाकता येणाऱ्या या साध्या स्वरुपाच्या जाहिराती असतील. यासाठी ‘ट्विटर’ने आपल्या स्क्रीनवरील रचनेतही बदल केलेला आहे. तसेच या प्रादेशिक बदलाचा ‘ट्विटर’च्या अधिकाधिक ग्राहक, जाहिरातदारांना लाभ व्हावा या उद्देशाने ‘ट्विटर’ची टीम काम करीत आहे. त्यानुसार ते यूझर्सच्या प्राफाईल लँग्वेजचीही माहिती घेत आहेत. ‘ट्विटर’चे गेल्या मार्चमध्ये सुमारे २२५ दशलक्ष यूझर्स होते. यात अधिकाधिक वाढ व्हावी, अशी ‘ट्विटर’ची इच्छा आहे. त्यासाठीच हा अभिनव बदल केला जात आहे.

good information