इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार गूगल व अॅपलला त्यांच्या गूगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवरून टिकटॉकचे यापुढे डाऊनलोड्स बंद करण्याच्या उद्देशाने काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत आहेत! काही सेकंदाचे छोटे व्हिडिओ आपल्या फोनवर शूट करून त्यांना विविध इफेक्ट देत संगीत देऊन या अॅपमध्ये पोस्ट करता येतात.
सुप्रीम कोर्टाने यासंबंधी मद्रास न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाच्या म्हणण्यानुसार या अॅपद्वारे पोर्नोग्राफिक वा अश्लील व्हिडिओचा प्रसार केला जात असल्याच निदर्शनास आलं आहे. गेल्या काही महिन्यात राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था, पोलिस यांच्यावर ट्रोलिंग करणारे व्हिडिओ पोस्ट करण्याचंही प्रमाण या टिकटॉकद्वारे वाढल आहे. त्यात अश्लील व्हिडिओना प्रसिद्धी दिली जात असल्याची बाब पुढे आल्यावर कोर्टाने थेट या अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत!
गेल्या आठवड्यात बाइटडान्स (ByteDance) या टिकटॉकची मालकी असणार्या कंपनीने नियम मोडणारे ६० लाख व्हिडिओ काढून टाकल्याच सांगितलं आहे! मात्र तरीही वापरकर्ते अॅपद्वारे काय अपलोड करतात यावर आमचं काहीही नियंत्रण राहू शकत नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात त्यांच्यातर्फे कोर्टात धाव घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे कंपनीचं मोठ नुकसान होईल आणि भारतातील बोलण्याच स्वातंत्र्य धोक्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे! टिकटॉक हे Bytedance या चिनी कंपनीने बनवलेलं व्हिडीओ अॅप असून बाईटडान्सनेच काही महिन्यांपूर्वी Musical.ly चं अधिग्रहण केलं आहे.
टिकटॉक गेल्या काही महिन्यात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल अॅप ठरलं आहे. भारतात तर आणखीच… २०१९ च्या चार महिन्यात त्यांच्या एकूण १८.८ नव्याने आलेल्या यूजर्सपैकी ८.८ कोटी यूजर्स भारतीय आहेत! पब्जीनंतर सध्या भारतीयांना कशाच वेद असेल तर या टिकटॉकचं या टिकटॉकवर अपलोड केला जाणारा कंटेंटतर आधी पासूनच चेष्टेचा विषय आहे. विक्षिप्त हावभाव करत संवाद जोडून प्रसिद्ध होण्याची संधी अनेकांना आवडली! यामधून अनेकांनी वेगवेगळे मार्ग अवलंबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली. अगदी काही दिवसांपूर्वीचीच बातमी म्हणजे एका १९ वर्षीय मुलाला कारमध्ये पिस्तूल घेऊन टिकटॉक व्हिडिओ शूट करताना चुकून गोळी सुटून प्राण गमवावे लागले. अनेक प्रकार ज्यामध्ये काही जणांचा आवाज, व्हिडिओ परवानगी न घेता परस्पर वापरुन बदनामी केल्याच्या, वाहन अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. हे प्रमाण आता इतकं वाढल आहे की कोर्टाला शेवटी यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
म्युझिकलीपासून सुरू झालेला हा टिकटॉकचा प्रवास भारतात तरी थांबण्याची चिन्हं आहेत. जोरात केलेल्या मार्केटिंगच्या बळावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या या अॅपचं भविष्य कोर्टाच्या हातात आहे. पुढे कोर्टात काय होईल, अॅपल वा गूगल हे अॅप काढून टाकतील का, सध्या इंस्टॉल असलेल्या लोकांनी याबाबत काय करायचं हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.
Search Terms : TikTok to be removed from Google Play and Apple App Store as per Court Orders