ब्लॅक होल म्हणजे मराठीत कृष्णविवर जे आजवर पाहणं किंवा चित्रित करणं अशक्य आहे असं समजलं जात होतं. आज या विचारांना मागे टाकत युरोपियन टेलिस्कोप Event Horizon Telescope ने ब्लॅकहोल (BlackHole) चित्रित केला असण्याची माहिती जाहीर होणार आहे!
कृष्णविवर ही काही तार्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्यांना कृष्णविवर म्हणतात.
माहिती साभार : विकिपीडिया
प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही अशा कृष्णविवराचा फोटो काढण्यामध्ये यश मिळवणं ही शास्त्रज्ञांसाठी नक्कीच फार मोठी गोष्ट असणार आहे. या गोष्टीबद्दल अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीव्हन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. जगभरातून अनेक जण या आज होणार्या घोषणेकडे लक्ष ठेऊन आहेत. यामध्ये नेमक काय सांगितलं जाईल याची माहिती सध्या उघड करण्यात आलेली नसली तरी शक्यता कृष्णविवराच्या पहिल्या छायाचित्राचीच असेल… त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये Breakthrough discovery in astronomy सांगण्यात आलं आहे!
या खगोलशास्त्रामधील मोठ्या घटनेबद्दल माहिती देण्यासाठी युरोपियन कमिशनने पत्रकार परिषद आयोजित केली असून ही आज १० एप्रिल सायं ६.३० वाजता लाईव्हस्ट्रिमद्वारे यूट्यूबवर पाहता येईल. लिंक : https://youtu.be/Dr20f19czeE
लेखाच्या सुरूवातीला असलेला फोटो हा अधिकृत नसून डिजिटल आर्टिस्टच्या कल्पनेतून कम्प्युटरवर तयार करण्यात आलेलाआहे याची नोंद घ्यावी.