गेल्या २-३ वर्षांतील ही वाढ मोठ्या प्रमाणात वाढलेल्या यूजर्ससोबत फसवणूक करत (खोटी आमिष दाखवून) हे गुन्हे घडवले जात आहेत. खासकरून भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोचण्यास ह्या घटना कारणीभूत ठरत आहेत. गृह खात्याच्या अहवालानुसार, २०१२ मध्ये २२,०६० केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. तर २०१४ मध्ये तब्बल ६२,१८९ केसेस सायबरक्राइमवर आधारित आहेत !
गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी याविषयी बोलताना सांगितलं की सायबर मॉनिटरिंग अधिक बळकट केल गेल पाहिजे जेणेकरून अतिरेकी कारवाया रोकता येतील आणि ऑनलाइन जातीय दंगे पसरवण्याची कामे थांबवता येतील. भारतीय सरकारने काही खास तज्ञ मंडळींची एक समिति स्थापन केली असून ही समिति अशा सायबर हल्ल्यांना कस प्रत्युत्तर द्यायचं यावर उपाय सुचवेल. सायबर गुन्ह्यामध्ये स्पॅमिंग, फिशिंग, काही वायरसयुक्त कोड, आणि वेबसाइट फेरफार अशा घटना घडत आहेत. सायबर गुन्हे हे अमेरिका, चीन, तुर्की, पाकिस्तान, ब्राजील, बांग्लादेश अशा ठिकाणांहून घडवले जात आहेत.
वाचकांना सुद्धा मराठीटेकचं आवाहन आहे की
- कम्प्युटरमध्ये चांगला अॅंटीवायरस इंस्टॉल करून घ्या
- बँकेचे अथवा कार्डचे पासवर्डस लिहून ठेऊ नका कोणाला सांगू नका.
- शक्यतो प्रत्येक ऑनलाइन गोष्टीसाठी अवघड असा alphanumeric पासवर्ड ठेवा (जसे की gtdhsy@!92115)
- तुम्हाला 1000000 $ चं बक्षीस लागलं आहे अशा मेसेजेसना बळी पडू नका (असे सर्व मेसेज नकली असतात)
- बँकेचे डिटेल्स फोनवरती कुणालाही कोणत्याही परिस्थितीत सांगू नका