- नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे असं तत्व ज्याद्वारे इंटरनेट सर्विस देण्यार्या कंपन्यानी(ISPs) आणि सरकारने इंटरनेटवरील सर्व माहितीला समान वागणूक दिली पाहिजे. कोणत्याही यूजरला ठराविक वेबसाइट, माहिती साठी वेगळे पैसे न घेता सर्व सुविधा एकाच दरात दिल्या पाहिजेत. एयरटेल, डोकोमो, रिलायन्स, आयडिया, वोडाफोन अश्या काही प्रसिद्ध इंटरनेट सर्विस देण्यार्या कंपन्या भारतात आहेत.
- थोडक्यात जर तुम्ही एखादा इंटरनेट पॅक घेतला असेल पण तुम्हाला यूट्यूब वापरण्यासाठी वेगळा चार्ज द्यावा लागेल किंवा जर तुम्ही चार्ज नाही दिला तर तुम्हाला यूट्यूब वापरता येईल मात्र ज्यांनी चार्ज दिलाय त्यांच्यापेक्षा कमी वेगाने ! तसेच कमी चार्ज मध्ये कमी स्पीड अधिक स्पीड साठी वेगळा चार्ज यामुळे यूजरना तो चार्ज देणं भाग पडत आणि टेलीकॉम कंपनीला फायदा होतो! यालाच नेट न्यूट्रॅलिटी भंग करणे म्हणतात.
- नेट न्यूट्रॅलिटीचा अर्थ इंटरनेटवरील सर्व माहिती सर्व वेबसाइट सर्वांना समान स्पीडने कायम वापरता येणे आणि तेही कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरसोबत कोणत्याही अटीशिवाय ..
- जसे की एयरटेलसाठी, एयरटेल WhatsApp वापरण्याकरता तुमच्याकडून वेगळा चार्ज घेऊ शकेल मात्र त्याचवेळी Hike हे App मात्र फ्री उपलब्ध असेल याच कारण लोकांनी त्यांचं Hike अॅप्लिकेशन वापरावं अशी त्यांची इच्छा असेल.
- अमेरिकेत सुद्धा भारताप्रमाणे टेलीकॉम कंपनी नेट न्यूट्रॅलिटी भंग करण्याच्या प्रयत्नात होत्या मात्र तिथल्या लोकांच्या तीव्र विरोधामुळे कंपन्यांना माघार घ्यावी लागली
खालील वेबसाइटनी नेट न्यूट्रॅलिटीबद्दल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आंदोलन उभारलय. याच वेबसाइट वर तुम्ही नेट न्यूट्रॅलिटीबद्दलच्या सध्याच्या घडामोडी पाहू शकाल. आणि तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यामुळं या सर्वांना सहकार्य करत नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा देऊया. मराठीटेकचा देखील नेट न्यूट्रॅलिटीला पूर्ण पाठिंबा आहे.
काही सेलेब्रिटी व पक्ष यांनी देखील नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा जाहीर केलाय जसे की कोंग्रेस, आम आदमी पक्ष, शाहरुख खान, रितेश देशमुख, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी, आलिया, परिणीती, वरुण, अर्जुन, बिपाशा, इ. या नेट न्यूट्रॅलिटीबद्दलच्या आंदोलनाला काही Apps व वेबसाइटनी स्वतः पाठिंबा दिला आहे जसे की Zomato, Amazon, MakeMyTrip, ClearTrip, Nasscom, IITs, IIMs, IISc
नेट न्यूट्रॅलिटी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद marathitech अशीच माहिती देत रहा – unmesh