सध्याच्या ऑनलाइन मराठी वाचकांचा विचार करता रोजच नवीन पोस्ट लिहणे आणि वाचकांपर्यंत पोहचवणे काहीसं अवघड आहे कारण बरेच वाचक टेक न्यूजसाठी मराठीपेक्षा इंग्लिश साइटनाच प्राधान्य देतात. मात्र फेसबूकवर मात्र सर्वच प्रकारच्या लेखांना चांगला प्रतिसाद लाभतो. म्हणूनच मराठीटेक आता रोजच्या टेक्नॉलजी बातम्या, अपडेट, टिप्स, Apps बद्दल माहिती, टेकविश्वातील काही रंजक गोष्टी फेसबूक पेजवरच देईल.
(सरासरी ब्लॉगवर १००-२५० प्रतिदिन तर फेसबूक वर ३००-५०० प्रतिदिन वाचक असं दिसून आल्याने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय)
याधीच ५०० हून अधिक वाचकांनी मराठीटेकच्या फेसबुक पेजला पसंती दर्शवली आहे. आपणा सर्वांच्या प्रतिसादामुळेच आम्ही इथपर्यंत पोचलोय. तरीही आपणसुद्धा आपल्या मित्रांसोबत मराठीटेकचं पेज शेअर करून आम्हाला अधिक वाचकांपर्यंत पोचण्यास मदत करा. धन्यवाद.
मराठीटेक फेसबूक पेज लिंक : facebook.com/marathitechblog