SDXC मेमरी कार्ड आता फोटोग्राफर्सकडून कॅमेरा उपकरणांमध्ये वापरलं जातं. दिवसेंदिवस कॅमेरा गुणवततेमध्ये होणारी वाढ, अधिक रेजोल्यूशनमुळे व्हिडिओ, इमेज फाइल्सचा आकार वाढत जातो आणि मग कार्ड्स बदलत राहावं लागतं. यावर आता अधिकाधिक स्टोरेज असलेली कार्ड्स येत असून लेक्सर या कंपनीने थेट 1TB स्टोरेज असलेली SDXC कार्ड काही दिवसांपूर्वी सादर केलं आहे!
या कार्डचा वेग 95MB/s पर्यंत असेल आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लास स्पीड V30 असेल. Lexar 1TB 633x SDXC UHS-I कार्ड प्रोफेशनल फोटोग्राफर्स/व्हिडिओग्राफर्सना फार उपयोगी पडेल. आता 4K आणि काही महिन्यात 8K व्हिडिओ शूट करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल त्यानुसार इतरही कंपन्या आता 1TB व अधिक स्टोरेजची कार्ड्स नक्की सादर करण्याच्या प्रयत्नात असतील…
खरेतर 1TB कार्ड जाहीर करणारी पहिली कंपनी सॅनडिस्क मात्र त्यांनी २०१६ मध्ये जाहीर करूनही त्यांचं कार्ड अद्याप बाजारात उपलब्ध झालेलं नाही. लेक्सरने मात्र त्यांच्याआधी बाजारात उपलब्ध करून देण्यात यश मिळवल आहे! लेक्सर (Lexar)ची पॅरेंट कंपनी मायक्रॉनने लेक्सर बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र Longsys नावच्या कंपनीने खरेदी करून आता लेक्सर ब्रॅंड अंतर्गत पुन्हा कार्ड्सची विक्री सुरू केली आहे!