नोकियाचा नवीन स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन भारतात सादर झाला आहे. नोकियाने ‘नोकिया २’ हा स्मार्टफोन आणून स्वस्त स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. दोन दिवस चालणारी बॅटरी हे याचं वैशिष्ट्य असणार असून याची किंमत ९९ युरो (~ ₹७५००) आहे. ह्या फोनची नोव्हेंबर महिन्यात विक्री सुरू होईल.
नोकियाने याआधी माध्यम किंमतीचे नोकिया ३,५ व जास्त किंमतीचे नोकिया ६,७,८ सादर केले आहेत.
अँड्रॉइड अपडेट्स आणि बिल्ड क्वालिटी (गुणवत्ता) ग्राहकांना आकर्षित करत असून यामुळे फोनची किंमत इतर कंपन्यांच्या मानाने जास्त आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन २१२ हा प्रोसेसर, ५ इंची एचडी डिस्प्ले, मोठी बॅटरी, गूगल असिस्टंट ही याची आणखी काही वैशिष्ठ्ये…
नोकिया २ सुविधा : Nokia 2 Features:
डिस्प्ले : 5.0” HD, 1280 x 720, Corning Gorilla Glass 3
ओएस : अँड्रॉइड नुगट (Android 7.1.1 Nougat)
कॅमेरा : 8MP ऑटो फोकस
फ्रंट कॅमेरा : 5MP फिक्स्ड फोकस
रंग : Black, White, Copper Black
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 212, Quad-core up to 1.3Ghz
रॅम : 1 GB, स्टोरेज : 8 GB आणि MicroSD Support up to 128 GB
इतर Bluetooth 4.1, Drip protection (IP52)
सेन्सर: Ambient light sensor, Proximity sensor, Accelerometer (G-sensor), E-compass
बॅटरी : 4100 mAh (दोन दिवस टिकेल असा दावा!)
किंमत : ९९ युरो (~ ₹७५००)